डायबेटीजग्रस्त रूग्णांसाठी कोरोना व्हायरस ठरू शकतो धोकादायक, कारण....!

 डायबेटीजग्रस्त लोकांनी कोरोनापासून अधिक काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

Updated: Jun 3, 2021, 08:39 PM IST
डायबेटीजग्रस्त रूग्णांसाठी कोरोना व्हायरस ठरू शकतो धोकादायक, कारण....!

मुंबई : देशात गेल्या वर्षापासून कोरोनाने थैमान घातलं असून प्रत्येकजण या व्हायरसपासून स्वतःची काळजी घेतोय. मात्र डायबेटीजग्रस्त लोकांनी कोरोनापासून अधिक काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. डायबेटीजग्रस्त लोकांना कोरोना होण्याचा धोका अधिक नसतो मात्र या रूग्णांना कोरोना होणं फार धोकादायक असतं. एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की, कोरोनाच्या काळात जितके रूग्ण रूग्णालयात दाखल झाले त्यापैकी 25 टक्के रूग्ण डायबेटीजने ग्रस्त असल्याची माहिती आहे. 

डायबेटीजग्रस्त रूग्णांमध्ये कोरोना व्हायरस धोकादायक ठरण्याचं मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे रूग्णाची ब्लड शुगर वाढली तर त्याची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अशा परिस्थितीत कोरोनाचं संक्रमण डायबेटीजग्रस्त रूग्णांमध्ये वेगाने पसरण्याची शक्यता असते. मेदांता रूग्णालयातील इंटरनल मेडिसीनच्या असोसिएट कंसल्टंट डॉ. रूचिता शर्मा यांच्या सांगण्यानुसार, डायबेटीजग्रस्त रूग्णांमध्ये कोरोनाचा मोर्टालिटी रेट अधिक आहे. 

डॉ. रूचिता म्हणतात, डायबेटीजग्रस्त रूग्णांमध्ये ब्लॅक फंगस हे इन्फेक्शन होण्याचा धोकाही अधिक असतो. या कारणाने रूग्णांमध्ये हाय ब्लड शुगर लेवलने इम्युनिटी कमी होते. 

डॉ. रूचिता यांच्या माहितीप्रमाणे, डायबेटीजग्रस्त रूग्णांना कोरोना झाल्यावर त्यांना कीटोअॅसिडोसिसचा धोका अधिक असतो. मुख्य म्हणजे डायबेटीजच्या रूग्णांमध्ये ज्यावेळी इन्फेक्शन होतं त्यावेळी त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अॅसिड तयार होण्याची शक्यता असते ज्याला किटोन्स म्हटलं जातं. हे किटोन्स तयार झाल्यानंतर रूग्णाच्या शरीरात इलेक्ट्रोलाइट्स आणि फ्लूएडची कमतरता निर्माण होते. अशा परिस्थितीत रूग्णाला इन्फेक्शन झालं तर ते मोठ्या प्रमाणात पसरतं. 

इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी शरीरात  इलेक्ट्रोलाइट्स आणि फ्लूएडची लेवल योग्य असणं गरजेचं असतं. मात्र कीटोअॅसिडोसिसमुळे रूग्णाच्या शरीरातील इलेक्टोलाईट्सचा समतोल राखणं ड़ॉक्टरांना कठीण असतं. हेच रूग्णासाठी धोकादायक ठरू शकतं.

डायबेटीज रूग्णांनी शरीरातील ब्लड शुगरची लेवल राखणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, इन्सुलिन आणि औषधंही वेळेवर घ्यावीत, असंही डॉ. रूचिता यांनी सांगितलं आहे.