'या' गोष्टींवर २८ दिवसांपर्यंत जिवंत राहतो कोरोना व्हायरस

संशोधनात समोर आली नवीन गोष्ट 

Updated: Oct 12, 2020, 04:15 PM IST
'या' गोष्टींवर २८ दिवसांपर्यंत जिवंत राहतो कोरोना व्हायरस

मुंबई : कोरोना व्हायरसवर जगभरातील लोक लस शोधत आहेत. या दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायन्स एजेंसी सीएसआयआरओ (CSIRO) ने कोरोना व्हायरसबाबत नवीन वक्तव्य केलं आहे. सीएसआयआरओचं म्हणणं आहे की, एका नियंत्रित वातावरणात कोरोना व्हायरस अधिक वेळेपर्यंत संक्रमित होत असतो. हे स्टडी वायरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित केलं आहे. 

सीएसआयआरओच्या संशोधकांनी अनुभवलं की, २० डिग्री सेल्सियसवर SARS-COV-2 व्हायरस मोबाइल फोन स्क्रीन, नोट्स आणि काच सारख्या चिकट स्तरावर २८ दिवस संक्रमित राहतात. याची तुलना आता इन्फ्लुएंजा ए व्हायरस जो १७ दिवसांपर्यंत जिवंत राहतो. 

संशोधकानी दिलेल्या माहितीनुसार, हा अभ्यास हात धुणे, सेनेटाइजिंग आणि व्हायरसच्या संपर्कात आल्यास सतत स्वच्छता राखणं महत्वाचं आहे. जवळपास एक महिना कोरोना व्हायरस जिवंत राहतो. त्यामुळे याचा धोका एक महिना असतो. २०,३० आणि ४० डिग्री सेल्सियसवर वैज्ञानिकांनी याचा अभ्यास केला आहे. हा व्हायरस थंड वातावरणात जास्त काळ जिवंत राहतो. चिकट गोष्टींवर आणि प्लास्टिकच्या गोष्टींवर पेपर नोटच्या तुलनेत जास्त काळ कोरोनाचा व्हायरस जिवंत राहतो. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी केलेल्या वक्तव्यामुळे चिंता वाढली आहे. सोमवारी तज्ञांनी केलेल्या वक्तव्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. 'जगभरात प्रत्येक दहावा व्यक्ती कोरोनोबाधित असू शकतो.' WHO ने केलेल्या वक्तव्यानुसार, जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पॉझिटिव्ह असलेल्या एकूण संख्येच्या जवळपास २० टक्के अधिक असू शकते.