कोरोना संक्रमणाचा धोका 31 टक्क्यांनी कमी करेल ही सवय, अभ्यासकांचा दावा

अभ्यासकांच्या संशोधनात समोर आली महत्वाची गोष्ट 

Updated: Apr 23, 2021, 07:08 PM IST
कोरोना संक्रमणाचा धोका 31 टक्क्यांनी कमी करेल ही सवय, अभ्यासकांचा दावा  title=

मुंबई : भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने पहिल्या लाटेला मागे टाकलं आहे. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे. अशावेळी प्रत्येक जण स्वतःची काळजी घेत आहेत. जेणेकरून ते कोरोनापासून लांब राहतील. (Coronavirus Regular exercise may cut Covid 19 death risk ) अभ्यासकांचा दावा आहे की, असे काही फॅक्टर आहेत जे केल्यावर तुम्ही कोरोनापासून 31 टक्के दूर राहाल. 

व्यायाम केल्याने शरीर फिट राहतं. मात्र नवी अभ्यासात याला अनन्यसाधारण महत्व आहे. कोरोनाच्या लढाईत व्यायाम तुम्हाला अधिक फायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. हा अभ्यास स्कॉटलँडच्या ग्लासगो कॅलेडोनियन विद्यापीठातील संशोधकांनी सांगितलं आहे. 

हा पहिला असा संशोधनाचा विषय आहे ज्यामध्ये व्यायाम आणि कोविड 19 इम्युनिटी यांना एकत्रित करून केली. या अभ्यासानुसार 30 मिनिटं, आठवड्यात 5 दिवस 150 मिनिटं व्यायाम केल्याचा फायदा होतो. अभ्यासात चालणे, धावणे, सायकलिंग सारखे व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. 

अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, व्यायाम कोरोनाच्या लसीची क्षमता 40 टक्क्यांनी वाढलं आहे. व्यायामामुळे कोविडचा धोका 31 टक्के दूर राहिल. कोरोना महामारीत मृत्यूचा धोका 37 टक्के कमी होत आहे. ग्लासगो कॅलेडोनियन विद्यापीठात प्राध्यापक सेबस्टियन चॅस्टिन यांचं म्हणणं आहे की,'फिजिकल ऍक्टिविटी इम्यून सिस्टमची संरक्षण करतात आणि इम्यून सेल्सला मजबूत करतात.' चॅस्टिनचं म्हणणं आहे की,'आमचा रिसर्च सांगतो की, रेग्युलर फिजिकल ऍक्टिविटी संक्रमणापासून वाचवतात.'