CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये वाटले गेले तब्बल 1.5 लाख Condoms, पण का?

कॉमनवेल्थच्या आयोजकांनी 12 दिवसांत 1.5 लाख कंडोमचं वाटप केलं होतं.

Updated: Aug 12, 2022, 11:08 AM IST
CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये वाटले गेले तब्बल 1.5 लाख Condoms, पण का? title=

मुंबई : मंकीपॉक्स हळूहळू जगभर पसरताना दिसतोय. बर्मिंगहॅममध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत 2022 मध्ये याबाबत दक्षता घेतली गेली. युनायटेड किंगडममध्ये वाढत्या केसेसमुळे यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) मंकीपॉक्सबद्दल खूप चिंतेत आहे. कारण या मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लाखो चाहते आणि हजारो खेळाडू वेगवेगळ्या शहरांतून आले होते.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने खेळाडूंना शारीरिक संबंध ठेवताना काळजी घेण्यास सांगितलं होतं. यासाठी एजन्सीने गेम्स व्हिलेजमध्ये सुमारे दीड लाख कंडोमचं वाटपही केलं होतं.

एजन्सीच्या म्हणण्याप्रमाणे, विजयाच्या आनंदामुळे गेम्स व्हिलेजमध्ये पार्टीचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत शारीरिक संबंध ठेवताना पूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून लैंगिक संक्रमित (STI) संसर्गाचा धोका कमी करता येईल. मंकीपॉक्स शारीरिक संपर्कामुळे पसरू शकतो.

कॉमनवेल्थच्या आयोजकांनी 12 दिवसांत 1.5 लाख कंडोमचं वाटप केलं होतं. जेणेकरून प्रत्येक खेळाडूकडे सुमारे 23 कंडोम असतील. गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये वितरित झालेल्या एकूण कंडोमपेक्षा 10 हजार कंडोम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये वितरित करण्यात आले होते.