Dengue Fever: पावसाळ्याच्या दिवसांत गढूळ पाण्यामुळे नागरिकांना आजार होण्याची शक्यता आहे. अशामध्ये डेंग्यूची साथ पसरण्याचा धोकाही अधिक असतो. डेंग्यू हा विषाणूजन्य संसर्ग असून एडिस डासांच्या चाव्यामुळे होतो. पावसामुळे ज्या घरांमध्ये पाणी साचते, त्यांनी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. अशा ठिकाणी पाणी साचण्याचा आणि डासांची उत्पत्ती होण्याचा धोका लक्षणीय वाढतो. ज्या लोकांना डेंग्यू होतो, त्यांची लक्षणे शरीरावर दिसू लागतात.
डेंग्यूच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ आणि पुरळ येणं यांचा समावेश होतो. मात्र याशिवाय डेंग्यूच्या रुग्णांना शरीरात जास्त खाज येत असल्याची तक्रार करतात. डेंग्यूच्या रूग्णांना शरीरावर खाज का येते याचं कारण जाणून घेऊया. डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात त्यामुळे शरीर कमकुवत होऊ लागते. डेंग्यूच्या रुग्णाच्या शरीरात खूप वेगाने खाज सुटते.
मिळालेल्या माहितीनुसार, काहीवेळा ही खाज इतकी धोकादायक असते की, खाज सुटल्याने व्यक्ती रात्रभर झोपू शकत नाही. डेंग्यूमुळे इतकी तीव्र खाज येते की रूग्णाला ती सहन करणं कठीण जातं. कधी कधी खाज इतकी वाढते की, रात्रभर झोप घेणं अवघड जातं.
डेंग्यूच्या रूग्णाला शरीराला जर खाज येत असेल तर त्याचा नेमका अर्थ काय?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अनेकदा डेंग्यूच्या रूग्णांना खाज सुटू लागते. मात्र खाज सुटणं म्हणजे रुग्ण बरा होत असल्याचं लक्षण असतं. डेंग्यूच्या वेळी अंगावर येणाऱ्या पुरळांचं नंतर जखमांमध्ये रूपांतर होतं. डेंग्यूच्या रुग्णाच्या शरीरावर खाज सुटणं हे दुसऱ्या आजारामुळेही होऊ शकतं.
ज्यावेळी रूग्ण डेंग्यूपासून बरा होत असतो तेव्हा त्याच्या शरीरावर खाज सुटू लागते. ही खाज एक ते दोन दिवसात स्वतःच बरी होते. कधीकधी ही खाज रूग्णांना इतकी सतावते की रूग्ण अस्वस्थ होतो. काहींना डेंग्यूपासून बरे होण्यासाठी आठवडा लागतो.