हुश्श...! डोंबिवलीतील Omicron बाधित रूग्णाला डिस्चार्ज

राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण बरा झालाय.

Updated: Dec 9, 2021, 08:18 AM IST
हुश्श...! डोंबिवलीतील Omicron बाधित रूग्णाला डिस्चार्ज title=

मुंबई : कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटने संपूर्ण जागाची चिंता वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा राज्यातील पहिला रूग्ण सापडला होता. मात्र एक दिलासादायक बातमी म्हणजे हा रूग्ण आता बरा झाला असल्याची माहिती आहे. 

राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण बरा झालाय. डोंबिवलीत सापडलेल्या या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र पुढील 7 दिवस या रूग्णाला क्वारंटाईनमध्ये रहावं लागणार आहे.

योगायोग म्हणजे या रुग्णाला वाढदिवशीच कोविड निगेटिव्ह झाल्याचं गिफ्ट मिळालंय. कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्याला 27 तारखेला रुग्णालयात दाखल केलं होतं.

33 वर्षांचा हा व्यक्ती राज्यातील हा पहिला ओमायक्रॉन बाधित होता. या व्यक्तीने दक्षिण आफ्रिका, दिल्ली आणि मुंबई असा प्रवास केला होता. कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्याच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर आता हा व्यक्ती बरा झाला आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने कोरोना लसीचा एकही डोस घेतला नव्हता. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची टेस्ट करण्यात आली. सुदैवाने या सर्वांची निगेटिव्ह आली होती.

तर दुसरीकडे महाराष्ट्राने 12 कोटी लाभार्थ्यांचा लसीकरणाचा विक्रमी टप्पा गाठलाय. 7 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात एकूण 12 कोटी 3 लाख 18 हजार 240 लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतलीये. यापैकी 7 कोटीहून अधिकांनी लसीचा पहिला डोस घेतलाय. तर, 4 कोटीहून अधिक लोकांनी दुसरा डोस घेतला असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरून दिलीये.