Diwali hacks 2022: वापरल्यानंतर फेकू नका लिंबाच्या साली..आहेत खूप फायदे

 लिंबाच्या रसामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. त्याचा वापर खाद्यपदार्थांपासून सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी केला जातो. 

Updated: Oct 25, 2022, 08:32 PM IST
Diwali hacks 2022: वापरल्यानंतर फेकू नका लिंबाच्या साली..आहेत खूप फायदे title=

lemon peel hacks: प्रत्येकाच्या घरात लिंबाचा वापर सर्रास करतोच पण लिंबू पिळून झाल्यावर त्याचा रस काढून झाला कि आपण फेकून देतो  पण तुम्हाला माहित आहे का  लिंबाच्या सालीचे खूप उपयोग आहेत (benefits of lemon peel) जे तुम्हाला माहितीसुद्धा नसतील.  लिंबाच्या रसामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. त्याचा वापर खाद्यपदार्थांपासून सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी केला जातो.  इतकेच नाही तर लिंबाचा रस हे उत्तम क्लिनर (lemon juice as cleaner) म्हणून सुद्धा वापरलं जात. चला तर जाणून घेऊया लिंबाची साल न फेकून देता आपण त्याचा रोजच्या आयुष्यात कसा वापर करू शकतो. (diwali hacks benefits of lemon peel don't throw them after use )

स्वच्छतेपासून ते अगदी सौंदर्य वाढवण्यापर्यंत आपण लिंबाचा वापर करू शकतो. (uses of lemon peels)

ब्युटी रुटीनमध्ये वापरा
लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक ऍसिड (cytric acid) असते, जे ब्लीचिंग एजंट (bleaching agent) आहे.  ब्युटी रुटीनमध्ये सर्रास लिंबाचा वापर होतोच लिंबाची साल फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यांच्या मदतीने हाताचे कोपरे आणि टाचा स्वच्छ करू शकता यासाठी या साली तुम्ही या भागांवर घासू शकता हे उत्तमरीत्या काम करतील आणि तुम्हाला रिजल्ट मिळेल. 
 
मुंग्या घरातून पळून जातील
तुमच्या किचन मध्ये किंवा खोलीत कुठेही मुंग्या असतील तर तुम्हाला केवळ लिंबाच्या साली तिथे ठेऊन द्यायच्या आहेत मिनिटात मुंग्या तेथून निघून जातील. 
 
कॉफीचा मग साफ करा
कॉफी मग रोजच्या वापरां नंतर खराब होऊ लागतो. त्यावर डाग पडू लागतात यासाठी लिंबाच्या साली उत्तम पर्याय आहे. तुम्हाला केवळ या डाग पडलेल्या मग मध्ये लिंबाच्या साली टाकायच्या आहेत त्यात गरम पाणी घाला आणि तासभर ठेऊन द्या यांनतर पाणी फेकून द्या आणि मग स्वच्छ करा तुम्हाला डागविरहित मग मिळेल.   (diwali hacks benefits of lemon peel don't throw them after use )

सर्व भांडी चमकतील
बहुतेक घरांमध्ये तांबे, पितळ आणि स्टीलची भांडी वापरली जातात.  ते लिंबाच्या सालीने पॉलिश केले जातात. यासाठी लिंबाचा तुकडा मिठात बुडवा.  तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात बेकिंग सोडा देखील वापरू शकता. मग कोमट पाण्याने स्वच्छ करा.