लहान मुलांना सतत शौचाला होते? होईल हाडांचा चुरा, 'या' व्हिटॅमिनची कमतरता

Constipation in Children :  लहानपणीच मुलांचं आरोग्य सांभाळणे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण कमी वयात सुरु झालेल्या आरोग्यसमस्या मोठेपणी जास्त त्रासदायक ठरतात. मुलांना शौचाला नीट होतेय की नाही? हा पालकांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न असतो. अशावेळी लहान मुलांच्या शरीरात कशाची कमतरता आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 9, 2024, 09:49 AM IST
लहान मुलांना सतत शौचाला होते? होईल हाडांचा चुरा, 'या' व्हिटॅमिनची कमतरता title=

लहान मुलांना बऱ्याच वेळा पॉटीकडे जाण्याची सवय असते. परंतु जर तुमचं मुलं पॉटीला वारंवार जात असेल आणि त्याच्या पोटातून सतत पाणी निघत असेल तर तुम्ही काळजी घ्यावी. जर तुमच्या मुलाला जवळजवळ प्रत्येक महिन्याला जुलाब होत असेल किंवा त्याऐवजी इतर कोणत्याही आजाराचा त्रास होत असेल तर ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी अजिबात नाही. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण या गोष्टीमुळे तुमच्या मुलांना हाडांची समस्या निर्माण होते. धक्कादायक बाब म्हणजे हाडांचा भुगा होऊ शकतो. याचा परिणाम मुलांच्या वाढीवर देखील होतो. 

जर तुमच्या मुलालाही असाच त्रास होत असेल आणि तुम्ही त्या त्रासाला सामान्य आजार म्हणून दुर्लक्षित करु नका. अनेक पालक मुलांच्या या त्रासाला अतिशय सामान्य समजतात. पण मुलांच्या शरीरात आवश्यक जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यावर शौचाचा त्रास होतो असं तज्ज्ञ सांगतात. मुलांना शौचाला साफ न होत असल्याची अनेक समस्या समोर येत आहे. यामध्ये मुलांमध्ये जीवनसत्त्वे आणि कॅल्शियमची कमतरता आढळून येते. यामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असलेली अनेक मुले आहेत. त्यामुळे शरीरातील कॅल्शियमही कमी होत असून लहान मुलांची हाडे कमकुवत आणि ढिसूळ होत आहेत.

हाडांवर वाईट परिणाम 

जर मुलाला वारंवार जुलाब होत असेल तर समजा तुमच्या मुलामध्ये व्हिटॅमिन डी 3 ची कमतरता आहे. वारंवार जुलाब होणे हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. अतिसारासह थकवा आणि अशक्तपणा वाढल्यामुळे मुलाची हाडे आणि स्नायू दोन्ही वाढणे थांबते. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आतडे पोषण शोषू शकत नाहीत आणि अतिसार होतो. जर तुमच्या मुलामध्ये असे होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि पोषण तपासा.

व्हिटॅमिन डी 

आपल्या मुलांना व्हिटॅमिन डी पूरक आहार देऊ नका. सप्लिमेंट म्हणून व्हिटॅमिन डीच्या गोळ्या, व्हिटॅमिन डी कॅप्सूल किंवा सिरप देऊ नका, असे डॉक्टर सांगतात. त्यापेक्षा मुलांना रोज किमान एक तास सूर्यप्रकाशात खेळू द्या.

जेवणात या गोष्टी द्या..

व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला दोन्ही वेळेला पोटभर आहार देणे. या जेवणात कडधान्य, भात, भाजी, रोटी, दही असणं खूप गरजेचं आहे. मुलाला दूध द्या. याशिवाय व्हिटॅमिन डीचा पुरवठा करण्यासाठी, मुलांना हिरव्या भाज्या खायला द्या, यापैकी पालक हा व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे.

वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)