ऑटिझमशी संबंधित तुमच्याही मनात गैरसमज आहेत का? आजच दूर करा

Autism spectrum disorder: ऑटिस्टिक मुले स्वभावाने हिंसक असा देखील एक गैरसमज समाजात पहायला मिळतो. मुळात ऑटिझम असलेल्या काही मुलांना स्वतःला व्यक्त करणे कठीण जात असले तरी त्यांना कोणतेही नुकसान होत नाही.

सुरभि जगदीश | Updated: Apr 11, 2024, 06:17 PM IST
ऑटिझमशी संबंधित तुमच्याही मनात गैरसमज आहेत का? आजच दूर करा title=

Autism spectrum disorder: ऑटिझम किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरचे हा एक गंभीर न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे ज्याने लाखो भारतीयांना घेरले आहे. हे सर्वात सामान्य विकासात्मक अपंगांपैकी एक आहे ज्यामध्ये सामान्यतः जन्मानंतरच्या 9 महिन्यांत लक्षणे दिसू लागतात.वेळीच तपासणी आणि निदानाद्वारे वयाच्या तीन वर्षांच्या वयापर्यंत मुलांचे निदान केले जाऊ शकते. ऑटिझम संबंधीच गैरसमज दूर करणे आणि जीवनाचा दर्जा सुधारणे ही काळाची गरज आहे.

मुंबईच्या एका रूग्णालयातील बालरोग विभागाचे डॉ दीपक उगरा यांच्या सांगण्यानुसार, ऑटिझम फक्त मुलांमध्येच दिसून येतो हा एक मोठा गैरसमज आहे. ऑटिझम हा एक आजीवन विकासात्मक विकार आहे, जरी चिन्हे आणि लक्षणे बालपणात दिसून येतात तरी, ऑटिस्टिक वैशिष्ट्ये प्रौढांमध्ये देखील दिसून येतात. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक प्रौढांना आयुष्याच्या उत्तरार्धातही या विकाराचे निदान होते.

ऑटिस्टिक मुले स्वभावाने हिंसक असा देखील एक गैरसमज समाजात पहायला मिळतो. मुळात ऑटिझम असलेल्या काही मुलांना स्वतःला व्यक्त करणे कठीण जात असले तरी त्यांना कोणतेही नुकसान होत नाही. ऑटिझम असलेली बहुसंख्य मुले त्यांच्या भावनांना तोंड देण्यासाठी आणि लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी संघर्ष करतात परंतु ते अजिबात हिंसक किंवा इतरांसाठी धोका निर्माण करणारी नसतात. अशा मुलांशी प्रेम, आदर आणि सहानुभूतीने वागले पाहिजे.

डॉ दीपक उगरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटिझम असलेले लोक स्वतंत्रपणे जगू शकत नाहीत तसेच ही मुलं जीवनात यशस्वी होऊ शकत नाहीत हा देखील एक गैरसमज आहे. ऑटिझमचा लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. काहींना सतत आधाराची  गरज भासू शकते, तर काही मुलं स्वतंत्र आयुष्य जगतात. ही मुलं देखील त्यांच्या आवडीचे छंद जोपासू शकतात आणि त्यांच्या संबंधित करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतात. योग्य समर्थन आणि संसाधनांसह ऑटिझम असलेल्या व्यक्तींचा योग्य विकास होऊ शकतो. ही मूलं देखील स्वतःची ओळख निर्माण करू शकतात.

ऑटिझम असलेले लोक बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असतात आणि कार्यक्षमतेने संवाद साधण्यास असमर्थ असतात हा देखील एक गैरसमज आहे. वास्तविक पाहता ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) असलेली प्रत्येक व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असेलच असे नाही. ऑटिझम असलेले कित्येत व्यक्ती कोणत्याही भीतीशिवाय योग्यरित्या संवाद साधू शकतात. वाढत्या स्क्रीन टाईममुळे मुलांचे खूप नुकसान होत आहे, त्यामुळे असे करणे टाळा.