थंडीत १ चमचा मध सेवनाचे २० गुणकारी फायदे

मध हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे.  आणि याचे सेवन कायमच हितकारक असते. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 6, 2017, 08:04 PM IST
थंडीत १ चमचा मध सेवनाचे २० गुणकारी फायदे  title=

मुंबई : मध हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे.  आणि याचे सेवन कायमच हितकारक असते. 

दररोज दोन चमचे मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी, उर्जवान, स्वस्थ राहते, परंतु थंडीमध्ये याचे सेवन केल्यास खूप फायदे प्राप्त होतात. थंडीत वातावरणातील गारवा आणि शरिरात होणारे बदल यासाठी मध ही अतिशय चांगली असते. 

मधात हे मिश्रण असते 

मधामध्ये फ्रुक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज, माल्टोज अशा सर्व महत्वाच्या आणि आवश्यक शर्कारांचे मिश्रण असते. या सर्वांमध्ये एकत्रितपणे ७५ टक्के साखर असते. मधाला गुणाकरी का म्हणतात याचा अंदाज यावरून येईल की मधामध्ये एन्जाइम, अमीनो एसिड, प्रोटीन, एल्ब्युमिन, कार्बोहायड्रेट्स, आयोडीन, लोह, सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम, क्लोरीन इत्यादी गुणकारी तत्व असतात. 

मध खाण्याचे  फायदे 

१) मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. 

२) हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो. मात्र रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यास असे व्हायरल आजार पटकण होत नाहीत

३) हिवाळ्यामध्ये पटकण भूक लागत नाही त्यामुळे भरपूर भूक लागण्यासाठी मध उपयोगी ठरतो.

४) त्याचप्रमाणे मधाच्या सेवनाने ताजेतवाने राहण्यास मदत तर होतेच, शिवाय पाचन शक्ती सुधारते.

५) खाज, खरूज यासारख्या त्वचेसंबंधीत आजारांचा ज्यांना त्रास होतो त्यांनी ग्लासभर पाण्यात एक चमचा मध घालून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. त्यामुळे या त्वचा रोगांचा त्रास कमी होतो.

६ ) व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो. 

७) कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो. 

८) उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते. 

९) रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे. 

१०) हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे. 

११) रोज मध खाल्याने आरोग्य कायम राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.

१२) मधाचे सेवन केल्यावर पिंपल्स दूर करण्यात उपयोगी ठरते. तुम्ही गुलाब पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो. 

१३) रोज पाण्यात मध टाकून प्यायल्यास पोट हलके राहते. 

१४) पिकलेल्या आंब्याच्या रसात मध टाकून खाल्ल्यास कावीळ दूर करण्यात फायदा होतो. 

१५) चेहऱ्या कोरडेपणा दूर करण्यासाठी मध, साय आणि बसन यांचे उटणे लावल्यास चेहरा मुलायम होतो. यामुळे चेहऱ्यात चमक येईल. 

१६) रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात. 

१७) मध भाजलेल्या त्वचेचा उपचार करण्यात मदत करतो. एक्झिमा, त्वचा सुजणे आणि इतर विकारांध्ये मध प्रभावशाली आहे. 

१८) टॉमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध टाकून दररोज घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठचा त्रास दूर होतो. 

१९) मध हे अँटीबॅक्टेरियल आणि एन्टी मायक्रोबियल गुण आहे. मध बॅक्टेरियाची वृद्ध रोखतो. त्याशिवाय जखम, कापणे आणि भाजलेल्या ठिकाणी किवा जखमेला लावल्यास फायदा होतो. 

२०) मध जखमेला स्वच्छ करणे, दुर्गंधी आणि दुखण्याला दूर करणे आणि लवकर बरी करण्यात उपयोगी ठरते.