कोरोना लसीचा खरच महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम? अखेर सत्य समोर

कोरोना प्रतिबंधक लसीमुळे मासिक पाळीत बदल होत असल्याचं दिसून आलंय. परंतु आतापर्यंत याला कोणताही वैज्ञानिक पुरावा असल्याचं समोर आलेलं नाही. 

Updated: Jan 31, 2022, 12:37 PM IST
कोरोना लसीचा खरच महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम? अखेर सत्य समोर title=

मुंबई : कोरोनाच्या लसीमुळे महिलांच्या मासिक पाळीत बदल होतो की नाही याबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. काही डेटावरून असं दिसून आलंय की, कोरोना प्रतिबंधक लसीमुळे मासिक पाळीत बदल होत असल्याचं दिसून आलंय. परंतु आतापर्यंत याला कोणताही वैज्ञानिक पुरावा असल्याचं समोर आलेलं नाही. 

तर आता इम्पीरियल कॉलेज लंडनच्या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासाच्या आधारे दावा केला आहे की, ज्या महिलांनी कोरोना लस घेतलीये त्यांच्या मासिक पाळीत काही बदल झालेत. परंतु हे बदल खूप लवकर पूर्ववत असल्याचं दिसून आलंय. हे बदल काही वेळानंतर मासिक पाळीत सामान्यपणे सुरु होते असं तज्ज्ञांनी सांगितलंय. 

संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोना प्रतिबंधक लसीमुळे मासिक पाळीवर परिणाम होत असला तरी तो लवकर सामान्य होतो.

ब्रिटिश मेडिकल जर्नलमधील एका पेपरमध्ये डॉ व्हिक्टोरिया मेल म्हणाले, एका अमेरिकन मासिक पाळीच्या ट्रॅकिंग अॅपमध्ये आढळून आलंय की लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर, सुमारे 4,000 महिलांमध्ये पुढील मासिक पाळी येण्यास एक दिवस उशीर झाला. परंतु त्यानंतर दुसऱ्यावेळी मासिक पाळी वेळेवर आली.

डॉ माले पुढे यांनी पुढे म्हटलं की, महिलांना मासिक पाळीदरम्यान अडचण येऊ नये म्हणून ब्रिटनमध्ये लस घेण्याचं अंतर 8 आठवड्यांचं आहे. एका अभ्यासात असं दिसून आलंय की, लस घेतलेल्या 10 पैकी एका महिलेमध्ये, मासिक पाळीचा कालावधी 8 दिवसांनी वाढला होता. परंतु दोन मासिक पाळीनंतर सर्वकाही सामन्य झाल्याचं समोर आलं. 

नॉर्वेमध्ये आणखी एक अभ्यास केला गेला. यामध्ये 5600 महिलांचा समावेश करण्यात आला होता. यातील 40 टक्के महिलांच्या मासिक पाळीत बदल लस घेण्यापूर्वीच दिसून आले. दरम्यान अनेक महिलांनी लस घेतल्यानंतर मासिक पाळीत पूर्वीपेक्षा जास्त रक्तस्त्राव झाल्याचं सांगितलं. 

डॉ. माले यांच्या सांगण्यानुसार, लस घेतल्यानंतर मासिक पाळीत किरकोळ बदल शक्य आहेत. परंतु स्त्रीचं शरीर अशा प्रकारे असतं की ते नैसर्गिक पद्धतीने सर्वकाही सामान्य करू शकतं.