मुंंबई: तुम्हांला अॅक्नेचा त्रास वारंवार होत असल्यास त्यामागील नेमके कारण तुम्ही वेळीच शोधणे गरजेचे आहे. कारण वातावरणातील धूळ,धूर, प्रदूषक यांच्यासोबतच शरीरात होणारे हार्मोनल बदल व अन्य बिघाडही अॅक्नेचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरतात. अनेकांमध्ये दूध आणि दुग्धजन्यपदार्थदेखील त्रासदायक ठरण्याची शक्यता असते.
दूध हे पूर्णअन्न मानले जाते. अनेकदा पचनाचा त्रास होत असल्यास किंवा अवेळी भूकेच्या वेळेस ग्लासभर दूध पिणे फायदेशीर ठरते. मग त्वचेवर अॅक्नेचा त्रास वाढवण्यास दूध खरंच कारणीभूत ठरतात का ? याचा उलगडा न्युट्री अॅडव्हाईसच्या संस्थापिका,प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. श्वेता स्वाहनी यांनी केला आहे. पहा काय आहे डॉ. श्वेता यांचा सल्ला –
गाईच्या दूधामधील काही हार्मोन्स तेलग्रंथींना चालना द्यायला कारणीभूत ठरतात. म्हणूनच ऑर्गनिक मिल्क / दूधाचा वापर करत असल्यास त्यामधील हार्मोन्स अॅक्नेचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरतात. तसेच दूधामध्ये फॅट्स/ मलई आणि साखर नैसर्गिकरित्या असते. त्याचा परिणाम अॅक्नेचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो. दूधामधील लॅक्टोज घटकांमुळे अॅलर्जिक रिअॅक्शन वाढण्याचा धोका काही लोकांमध्ये आढळतो. तसेच दूध आणि दूग्धजन्य पदार्थांमध्ये कॅसैन प्रोटीन आढळतात. त्यांच्यामुळे त्वचेमध्ये दाह वाढू शकतो.
अॅक्नेचा त्रास असणार्या व्यक्तींनी स्वतःकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यानुसार उपचार शोधणे गरजेचे आहे. मग तुम्हांला अॅक्नेचा त्रास होत असल्यास त्यामागे दूध आणि दूग्धजन्य पदार्थ असल्याचे नेमके कसे ओळखाल ? अशावेळी तुमच्या आहारातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ टाळा आणि पहा त्याचा अॅक्नेचा त्रास कमी होण्यास काही फायदा होतो का ? तुमच्या त्वचेवरील छिद्रं भरण्यास किमान 1 ते 2 महिन्यांचा काळ लागतो. अॅक्नेचा त्रास पूर्णपणे कमी करण्यास पुरेसा वेळ द्या. त्यामुळे तुमच्या आहारात योग्य प्रमाणात दुग्धजन्य पदार्थांचा वापर करा. अतिप्रमाणात त्याचे सेवन करू नका.
तुम्ही आहारातून दूध टाळण्याचा विचार करत असल्यास डाएटची विशेष काळजी घ्या. कारण यामुळे तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. दूधाऐवजी या हिरव्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश केल्यास कॅल्शियमची कमतरता भरून निघण्यास मदत होते.