Early Signs of Pregnancy: आई होणे ही प्रत्येक स्त्रीसाठी एक सुंदर भावना असते. गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत स्त्रीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गरोदरपणात स्त्रीच्या शरीरावरच नव्हे तर तिच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. इतकेच नाही तर गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येही स्त्रीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गर्भधारणेची लक्षणे महिलांच्या शरीरात अनेक बदलांसह येतात. ही लक्षणे स्त्रीच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यामध्ये बदल म्हणून प्रकट होतात. अनेक वेळा स्त्रीला ती कधी गरोदर असते हेच कळत नाही. अशा परिस्थितीत काही महिला याला सामान्य लक्षण मानून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु हे स्त्रीला निरोगी गर्भधारणेचे नियोजन करण्यापासून रोखू शकते. अशा परिस्थितीत, ही लक्षणे समजून घेणे आणि चाचणी घेणे महत्वाचे आहे.
मासिक पाळी येणे बंद होणे
गर्भधारणेच्या सुरुवातीला मासिक पाळी अचानक बंद होते. प्रत्येक महिला आपली मासिक पाळीची तारीख लक्षात ठेवते. पण एक दिवस अचानक ती बंद होते. हे सुरुवातीचे पहिले लक्षण असते.
उल्टीसारखं होणे
गर्भधारणा राहिल्यानंतर सुरुवातीच्या लक्षणांमध्ये महिलांना उलटी सारखं होणे हे एक आहे. तसेच ब्रेस्टच्या एका बाजूला दुखणे हा देखील त्यामधील एक लक्षण आहे. या लक्षणांना कधीच दुर्लक्ष करु नका.
छातीत दुखणे
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये महिलांना छातीत दुखणे हे देखील लक्षण आहे. महिलांना स्तनांच्या आजूबाजूला दुखणे हे देखील त्यातीलच एक लक्षण आहे. त्यामुळे सामान्य दुखापत समजून याकडे दुर्लक्ष करु नका.
थकवा आणि तणाव
गर्भधारणा ही आनंददायी असली तरी या लक्षणांमध्ये थकवा आणि तणाव हे देखील एक लक्षण आहे. अशामध्ये महिला कोणताही विषय नसताना थकवा किंवा तणावातून जाऊ शकते.
स्तनांमध्ये सूज
स्तनांमध्ये सूज येणे ही सामान्य बाब नसून हे गर्भधारणेचे लक्षण आहे. यामध्ये थकवा, ताण, कमकुवत आणि अशक्तपणा हे देखील त्यातील सुरुवातीचे लक्षण आहे.
ब्लोटिंगची समस्या
अनेक महिलांना गर्भधारणेच्या दिवसांमध्ये ब्लोटिंगची समस्या जाणवते. पोट फुगणे, पचनक्रिया बिघडणे यासारख्या समस्या जाणवतात. तसेच महिलांना या दिवसांमध्ये क्रेविंग होते म्हणजे डोहाळे लागतात. तसेच काही महिलांना काहीच खाऊ नये असे वाटते.
मूड स्विंग्स
गर्भावस्थेत अनेक महिलांना शारीरिक बदलांना सामोरे जावे लागते. यासोबतच अनेक महिलांना मानसिक बदलांना देखील सामोरे जावे लागते. मूड स्विंग्स, भावनिक गुंतागुंत हे देखील त्यातीलच एक लक्षण आहे. त्यामुळे या काळात महिलांना आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचा देखील विचार करावा.