डिप्रेशनमधून बाहेर निघायचंय तर खाण्यावर करा प्रेम

चांगले खाणे आणि आरोग्य एकमेकांशी संबंधित आहेत. एका रिसर्चमधून समोर आलंय की भारतात दर ४ पैकी १ तरुण तणावाचा शिकार ठरतोय. या तणावातून बाहेर यायचं असेल तर खाण्यावर प्रेम करा. भरपूर आणि वैविध्यपूर्ण खा ज्यामुळे तणाव दूर होईल. जाणून घ्या असे काही पदार्थ जे खाल्ल्याने तुम्ही तणावातून बाहेर येऊ शकता.

Updated: Jun 13, 2018, 07:20 PM IST
डिप्रेशनमधून बाहेर निघायचंय तर खाण्यावर करा प्रेम

मुंबई : चांगले खाणे आणि आरोग्य एकमेकांशी संबंधित आहेत. एका रिसर्चमधून समोर आलंय की भारतात दर ४ पैकी १ तरुण तणावाचा शिकार ठरतोय. या तणावातून बाहेर यायचं असेल तर खाण्यावर प्रेम करा. भरपूर आणि वैविध्यपूर्ण खा ज्यामुळे तणाव दूर होईल. जाणून घ्या असे काही पदार्थ जे खाल्ल्याने तुम्ही तणावातून बाहेर येऊ शकता.

फ्रूट चाट - किवी, केळे, आंबा, मोसंबी आणि अननस ही फळे एकत्रित कापून फ्रूट चाट बनवा. हे फ्रूट चाट खाल्ल्याने उदासीपणा कमी होईल. 

आईस्क्रीम - दुधापासून बनवलेली आईस्क्रीम खाल्ल्याने तुम्गासा चांगले वाटेल. आईस्क्रीमचे अनेक फ्लेवर असतात जे खाऊन तुम्ही रिफ्रेश होऊ शकता.

शेक - चॉकलेट शेक, मँगो शेक, स्ट्रॉबेरी शेकसारखे शेक प्यायल्याने तुम्ही तणावातून बाहेर निघू शकता.

हिरव्या भाज्या - हिरव्या भाज्या या नियमितपणे खा. हिरव्या भाज्या खासकरुन पालक खूप फायदेशीर आहे. कारण सर्व हिरव्या भाज्यांमध्ये सिरोटोनिन, फॉलिक अॅसिड आणि आर्यनसारखी तत्वे असतात. 

नारळपाणी - मूड ऑफ असेल तर गारेगार नारळपाणी प्या. यात फायबर, आर्यन, पोटॅशियम, प्रोटीन असते.. ज्यामुळे तणावातून बाहेर पडण्यास मदत होते. 

डार्क चॉकलेट - चॉकलेट कोणाला आवडत नाही? जर तुम्हाला उदास वाटत असेल तर चॉकलेट खा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.