नेहमीच्या आहारातील हे 5 पदार्थ वाढवतात कॅन्सरचा धोका

कॅन्सर  या आजाराच्या नावानेच अनेकजण घाबरतात.

Updated: Dec 18, 2017, 10:39 PM IST
नेहमीच्या आहारातील हे  5 पदार्थ वाढवतात कॅन्सरचा धोका    title=

मुंबई : कॅन्सर  या आजाराच्या नावानेच अनेकजण घाबरतात.

अनेकांना या आजाराची भीती वाटते म्हणून आरोग्यात आढळणारे लहान सहान बदलही दुर्लक्षित करतात. त्यामुळे अंतिम टप्प्यात पोहचलेल्या कॅन्सरला काबूत ठेवणे कठीण होऊन बसते.  

कॅन्सरबाबत लोकांच्या मनात गैरसमजुतीदेखील अनेक आहेत. दारू, तंबाखू, सिगारेट यामुळे तुम्हांला कॅन्सर होतो असे अनेकांना वाटते पण आहारातील अनेक इतर पदार्थांमुळेही कॅन्सरचा धोका बळावतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 

पॅक्ड फूड 

आजकाल धावपळीच्या जीवनात अनेकजण पॅक्ड फूड किंवा झटपट 'रेडी टू मेक' पदार्थांची निवड करतात. पण यामधील प्रिझर्व्हेटीव्ह घटक, केमिकल्सचा मारा यामुळे कॅन्सरचा धोका बळावतो. 

रिफाईन्ड साखर  

रिफाईन्ड साखरेमुळे कॅन्सरचा धोका बळावतो हे अनेकांना ठाऊकच नाही. ब्राऊन शुगर आरोग्याला हितकारी वाटत असली तरीही त्यामधील केमिकल्स, फ्लोअर्स, रंग आरोग्याला घातक ठरतात. 

फ्राईड फूड 

वेळी अवेळी लागणार्‍या भूकेवर मात करण्यासाठी अनेकदा लोकं चटपटीत तळलेले पदार्थ, भज्या अशा गोष्टींची निवड करतात. पण तळकट पदार्थांचे अतिसेवन शरीरात कॅन्सर सेल्स वाढवण्यास कारणीभूत ठरतात. 

व्हेजिटलऑईल 

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचा वापर प्रामुख्याने केला जातो. त्यामुळे तुम्ही कोणतं तेल निवडता हे पाहणं गरजेचे आहे. तेल ठराविक महिन्यांनी बदलणंही गरजेचे आहे. व्हेजिटेबल ऑईलमधील ऑमेगा 6 अ‍ॅसिड आरोग्याला घातक ठरते.  

कार्बोनेटेड ड्रिंक 

आहारात कार्बोनेटेड ड्रिंक्स पिण्याची सवय त्रासदायक ठरते. अशा ड्रिंक्समध्ये हाई-फ्रुटोज कॉर्न सिरीपि, केमिकल्स असतात. यामुळे पचनक्रियेमध्ये बिघाड होतो.