मुंबई : हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते, कारण याद्वारे आपल्या शरीराला अनेक महत्त्वाचे पोषक तत्व मिळतात. यामुळेच डॉक्टर देखील आपल्याला ते खाण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे बऱ्याच घरात आपल्या पालेभाज्या दिसतात, लोक आठवड्यातून एकदा तरी घरी पालेभाज्या बनवतात. परंतु तुम्हाला माहिती पालेभाज्यांमध्ये सर्वाधिक धोका आपल्या आरोग्याला आहे. कारण या भाज्या मातीत उगतात, ज्यामुळे मातीमध्ये असलेले बक्टेरीया, कीडे या भाज्यांच्या पाल्यावर जाऊन बसतात आणि आपल्या पोटात देखील जातात.
आधीच आपण पालेभाज्यांमधील पोषणतत्व टिकून राहण्यासाठी ते जास्त शिजवत नाही. त्यामुळे या भाज्यांमध्ये असलेले बॅक्टेरीया देखील मरत नाही. जे आपल्या पोटात जाऊन आपल्याला आजारी पाडतात. त्यामुळे पालेभाज्या शिजवण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे. नाहीतर यामुळे शरीराचं नुकसान होईल. चला याबद्दल काही माहिती जाणून घेऊ.
भाजीपाल्यामध्ये असलेल्या कीटक आणि बॅक्टोरीया व्यतिरिक्त, आणखी एक समस्या आहे जी दूर करणे फार महत्वाचे आहे आणि ती म्हणजे या भाज्यांवर फवारले गेलेल कीटकनाशके. त्यामुळे भाज्यांवरील हे किटकनाशकं साफ केली गेली नाही आणि ते आपल्या अन्नामध्ये समाविष्ट केले गेले तर ते शरीराला खूप नुकसान करू शकते. म्हणून, आपल्याला हिरव्या भाज्या अशा प्रकारे स्वच्छ कराव्या लागतील की हानिकारक कीटकनाशके देखील धुऊन निघतील.
सर्व प्रथम, आपल्या हातांनी हिरव्या भाज्या निवडून घ्या आणि खराब भाग टाकून द्या. त्यानंतर फक्त याभाज्यांवर पाणी टाकून साफ करु नका तर हाताने नीट चोळा. तसेच भाजी काही मिनिट पाण्यात राहू द्या. यामुळे भाजी वर तरंगू लागेल आणि माती हळूहळू भांड्याच्या तळाला जावून बसेल. मातीसोबत किटक देखील खाली जातील.
गरम पाणी हे अनेक रोगांवर औषध मानले जाते, जर हिरव्या भाज्यांची पानं किडे आणि कीटकनाशकांपासून मुक्त करायची असतील, तर प्रथम एका भांड्यात पाणी हलके गरम करा. आता या पॅनमध्ये हिरव्या भाज्या बुडवा आणि हाताने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्हाला अन्नातून विषबाधा होण्याची समस्या टाळता येईल.
तुम्हाला माहिती आहे का की बेकिंग सोडा रोजच्या वापरातील टूथपेस्टमध्ये वापरला जातो, ज्यामुळे तोंडातील जंतू साफ होतात. तुम्ही ही पावडर हिरव्या भाज्या आणि भाज्या धुण्यासाठी देखील वापरू शकता. यासाठी तुम्ही एका भांड्यात पाण्यात बेकिंग सोडा टाका आणि नंतर त्यात हिरव्या भाज्या बुडवा आणि नंतर ते पाण्याने स्वच्छ करा. तुम्ही यासाठी मीठाचा देखील वापर करु शकता.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)