नेहमीच्या वापरातील या '५' वस्तूंमधूनही वाढतो कॅन्सरचा धोका

आजकाल आपल्या जीवनात प्लॅस्टिकच्या पदार्थांचा वापर वाढला आहे.

Updated: Nov 27, 2017, 02:21 PM IST
नेहमीच्या वापरातील या '५' वस्तूंमधूनही वाढतो कॅन्सरचा धोका  title=

मुंबई : आजकाल आपल्या जीवनात प्लॅस्टिकच्या पदार्थांचा वापर वाढला आहे.

अगदी हेअरबॅन्डपासून आहाराशी निगडीत काही घटकांमध्येही प्लॅस्टिकचा वापर होतो. पण नियमित प्लॅस्टिकचा वापर आरोग्याला त्रासदायक आहे.  
वापरायला सुकर असल्याने अनेक भांडी, डब्बे, बॉटल्स आपण प्लॅस्टिकची निवडतो. पण त्यामध्ये बीपीए घटक असल्यास कॅन्सरचा धोका वाढतो. 

केवळ डब्बे, बाटलीतील प्लॅस्टिक बीपीए  फ्री करून पुरेसे नाही. कारण नेहमीच्या वापरातील इतर काही वस्तूंदेखील त्यांच्यातील बीपीए घटकांमुळे आरोग्याला त्रासदायक ठरते. 

वॉटर पाईप  - 

अनेकदा पिण्याच्या पाण्याच्या नळाला प्लॅस्टिकचा पाईप लावला जातो. यामधून पिण्याच्या वापरात किंवा वापराच्या पाण्यात घातक बीपीए घटकांचा समावेश वाढतो. प्रामुख्याने तुम्ही गरम पाण्याच्या नळाला अशाप्रकारचा प्लॅस्टिकचा पाईप लावत असाल तर ते आरोग्याला अधिक त्रासदायक ठरू शकतात.

लॅपटॉप्स

जगभरात कर्मचारी वर्ग हमखास लॅपटॉपचा वापर करतात. लॅपटॉपच्या अनेक भागांची  निर्मिती ही प्लॅस्टिकयुक्त घटकांनी केली जाते. कीबोर्डसारख्या वस्तूंमध्ये हे घटक अधिक असतात. 

सेलफोन 

आबालवृद्धांमध्ये आजकाल हमखास सेलफोनचा वापर केला जातो. सेलफोनमध्येही प्लॅस्टिकचा अधिक वापर केला जातो. एका अभ्यासामध्ये सेलफोनमधील प्लॅस्टिक घटक लठ्ठपणा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

लहान मुलांचे पेसिफायर्स आणि टीथर्स - 

लहान मुलांच्या दुधाच्या बाटलीला किंवा टीथर्समध्ये प्लॅस्टिकचा वापर केला जातो. अशा वस्तू घेण्यापूर्वीच बीपीए फ्री आहेत का ? हे तपासून पहा. बीपीए घटक अधिक प्रमाणात शरीरात गेल्यास लहान मुलांच्या आकलन क्षमतेवर परिणाम होतो. लहान मुलांमध्ये यामुळे ऑटिझम, मधूमेह यासारखे आजार वाढण्याची शक्यता अधिक आहे. 

रजिस्टर रिसिप्ट - 

क्रेडीट कार्ड आणि डेबिट कार्डमध्येही बीपीएस, बीपीए घटक आहेत. याचा सतत वापर करणार्‍यांमध्ये बीपीए कंटामिनेशन वाढते.