Exam Tips: चांगल्या रिझल्टसाठी विद्यार्थ्यांनी 'या' टीप्स फॉलो करा

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता तोंडावर आहेत. यावेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

Updated: Feb 19, 2022, 08:57 AM IST
Exam Tips: चांगल्या रिझल्टसाठी विद्यार्थ्यांनी 'या' टीप्स फॉलो करा title=

मुंबई : देशात कोरोनाची प्रकरणं आता कमी होताना दिसतायत. राज्यातंही आता कोरोना कमी झाल्याचं चित्र आहे. यामुळे आता पुर्ण क्षमतेने शाळा आणि कॉलेजं सुरु करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे बोर्डाच्या परिक्षाही ऑफलाईन घेतल्या जाणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता तोंडावर आहेत. 

विद्यार्थ्यांचे क्लास ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन असल्याने विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात दडपण दिसून येतंय. त्यांना या परिस्थितीत एडजस्ट होण्यास काही काळ जाऊ शकतो. अशातच परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांना मानसिक ताण येऊ शकतो. असं होऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

परीक्षेच्या वेळी गरजेचं आहे सेल्फ केअर

कोणतीही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जेव्हा तुमची लाईफस्टाईल अधिकच खराब असते त्यावेळी मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पहा कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

  • तुमचं रूटीन सेट करा. यामध्ये झोपणं, उठणं, खाणं-पिणं, अभ्यास यांचा वेळ निश्चित करा
  • अभ्यासाला तुमच्या डोक्यावरचं ओझं मानू नका. अभ्यासाच्यामध्ये काही काळ ब्रेक घ्या.
  • अभ्यासाच्या दरम्यान फिजीकल एक्टिव्हीटीवर भर द्या
  • परीक्षेचा काळ जवळ आला असताना तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष द्या. शक्यतो हेल्दी खाण्याची सवय लावा
  • जर तुमची शाळा आणि कॉलेज सुरु झालं असेल तर शिक्षकांशी बोलून तुमच्या अभ्यासातील अडचणी दूर करा