मुंबई : योगा, सायकलिंग, रनिंग, वॉक सारख्या एक्सरसाइज तुम्हाला फीट आणि अॅक्टिव ठेवण्यासाठी मदत करतात. एवढंच काय तर आता समोर आलेल्या रिसर्चनुसार, या व्यायामामुळे तुमचं शरीर फीट तर राहतं पण त्यासोबतच तुम्हाला आनंदी राहण्यासाठी हे व्यायाम प्रकार मदत देखील करतात.
शारिरीक व्यायाम करणारी व्यक्ती ही दिवसभर फक्त पडून राहणाऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक आनंदी असल्याच समोर आलं आहे. सामान्य व्यक्ती ही जर 1.4 टक्के आनंदी असेल तर श्रम किंवा व्यायाम करणारी ही व्यक्ती 1.5 टक्याहून अधिक आनंदी असते. मिळालेल्या माहितीनुसार, शारिरीक श्रम आणि मानसिक स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी कायम सतर्क राहायला हवे. तसेच मानसिक तणाव आणि भीती सारख्या गोष्टी काढण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. थोडसा व्यायाम देखील तुम्हाला अधिक आनंद देऊ शकतो हे अनुभवण्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागणार आहे.
एक हलकेसे हास्य तुमच्या फोटोला चारचांद लावतात. तर विचार करा अगदी मनमोकळेपणाने हसल्याने तुम्हाला किती फायदा होऊ शकतो. हास्य लाखो दु:खावरील एक औषध आहे. हसण्यामुळे आपले आरोग्यच नव्हे तर चेहराही अतिशय सुंदर बनतो. हसण्यामुळे शरीरातील मांसपेशी, डोळे, जबडे आणि ह्र्दयाला आराम मिळतो. तरीदेखील रोजच्या तणावामुळे अनेकजण हसणेच विसरुन जातात.
युनिर्व्हसिटी ऑफ मेरीलँडच्या शोधानूसार हसण्यामुळे संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. या शोधामध्ये दोन गट बनवण्यात आले होते. एक गटाला कॉमेडी कार्यक्रम दाखवला गेला व दुस-या गटाला ड्रामा. नंतर संशोधनात आढळून आले की, जे लोक कॉमेडी कार्यक्रमात मनमोकळेपणाने हसून आले होते. त्यांचे रक्ताभिसरण ड्रामामधील लोकांच्यात तुलनेत कितीतरी पटीने चांगले होते.
एका छोट्याशा हास्यामध्ये तणाव, वेदना आणि भांडणेही दूर करण्याची शक्ती असते. तुमच्या मनावर तसेच शरीरावर हास्यामुळे जो चांगला परिणाम होतो, तो इतर कोणत्याही औषधांमुळे होत नाही. तज्ञांचे सांगणे आहे की, हसण्यामुळे तुम्ही सामाजिक होतात व इतर लोकांसोबत आणखी चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकतात. तसेच मनमोकळेपणाने हसल्यामुळे मनावरील ओझे कमी होते, तणाव काही प्रमाणात दूर होतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्यासाठी हसणे हे सर्वोत्तम