पॅरासिटामॉलचे आपल्या शरीराला फायद्याऐवजी नुकसानच जास्त, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

खरं तर एका संशोधनातुन असे समोर आले आहे की, पॅरासिटामॉलचा अतिवापर केल्याने व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो.

Updated: Jun 26, 2022, 08:37 PM IST
पॅरासिटामॉलचे आपल्या शरीराला फायद्याऐवजी नुकसानच जास्त, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ title=

मुंबई : आपल्याला जर कधी बरं वाटलं नाही की, आपण एखादी पॅरासिटमॉल किंवा साधी गोळी घेऊन त्यावर आपला दिवस ढकलतो आणि थोडं बरं वाटायला लागलं की, आपण त्याचे दोन-चार डोस घेतो आणि बरे होतो. बरेच लोक हा असा प्रकार सारखाच करत असतात. परंतु तुम्हाला माहितीय बरं वाटंय म्हणून पॅरासिटमॉस खाणं चांगलं नाही, हे तुमच्या शरीराला हानि पोहोचवत आहे. होचय, तुम्ही बरं वाटण्यासाठी ही गोळी खात असलात, तरी याचे साइड इफेक्ट्स देखील भरपूर आहे. 

खरं तर एका संशोधनातुन असे समोर आले आहे की, पॅरासिटामॉलचा अतिवापर केल्याने व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्याच्या रोजच्या वापरामुळे रक्तदाब, हृदयविकाराचा झटका येण्याचा देखील धोका वाढतो.

चला याबाबत जाणून घेऊ या माहिती

या संशोधनात रुग्णांना दोन आठवडे दिवसातून चार वेळा पॅरासिटामॉलच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. चार दिवसांनी या रुग्णांची तपासणी केली असता, या रुग्णांचा रक्तदाब खूपच वाढला होता. उच्च रक्तदाबामुळे या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 20 टक्क्यांनी वाढली. जे खरोखरंच खूप धक्कादायक आहे.

हे संशोधन ब्रिटनमधील लोकांवर करण्यात आले आहे. 10 पैकी एक व्‍यक्‍ती दीर्घकालीन वेदनांसाठी दररोज पॅरासिटामॉल सप्लिमेंट घेते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की यूकेमधील तीनपैकी जवळजवळ एक प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे.

एडिनबर्ग युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डेव्हिड वेब म्हणाले की, आतापर्यंत पॅरासिटामॉलला सुरक्षित औषध म्हणून पाहिले जात होते. पण या संशोधनानंतर रुग्णांनी पॅरासिटामॉलपासून दूर राहावे. असे डॉक्टर सांगतात.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)