Covid Omicron XBB Variant : सध्या असा दावा करण्यात येतोय की, नवा कोरोना व्हायरस म्हणजे, ओमायक्रॉन XBB आणि बीएफ.7 या व्हायरसची लागण झाल्यास मृत्यू ओढावू शकतो. ओमायक्रॉन XBB (Covid Omicron XBB) हा डेल्टापेक्षाही 5 पट जास्त धोकादायक आहे. या व्हायरसची लक्षणं दिसत नसल्याने धोका अधिक असल्याचा दावा करण्यात आलाय.
चीनमध्ये मृत्यूचा कोरोनाचा कहर सुरू असताना असे मेसेज व्हायरल झाल्याने भीतीचं वातावरण पसरलंय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. जाणून घेऊया व्हायरल होत असलेल्या मेसेजमागे सत्य काय आहे.
कोरोनाचा ओमायक्रॉन XBB व्हायरस फुफ्फुसांवर परिणाम करतो. नेझल स्वॅबने केलेली चाचणी निगेटिव्ह येते. गंभीर न्यूमोनिया आणि श्वसन समस्या उद्भवून मृत्यू ओढावू शकतो. मास्कही कामी येत नाही.
हा दावा केल्यानं सत्यता पडताळणीसाठी एक्सपर्टचा सल्ला घेण्यात आला. कोरोनामुळे आधीच लोकांच्या मनात भीती आहे. यात असे दावे केल्याने कोरोना पुन्हा आल्यास काय करावं याचाच विचार लोकांच्या मनात आहे. पण या दाव्यात किती तथ्य आहे याची माहिती जाणून घेतली. तसंच आरोग्य विभागाकडूनही माहिती घेतली.
कोरोना होऊ नये यासाठी आपण काळजी घ्यायला हवी. वेळीच उपचार घेतल्यास गंभीर परिणाम होणार नाहीत. त्यामुळे अशा व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत ओमायक्रॉन XBB व्हेरियंटने मृत्यू ओढावू शकतो हा दावा असत्य ठरला.
Covid Omicron XBB या नवीन व्हेरियंटबद्दल सोशल मीडियावर यापूर्वीही माहिती फिरत होती. याबाबत केंद्र सरकारने मोठा खुलासा केला होता.
कोविड ओमिक्रॉन एक्सबीबी व्हेरियंटच्या लक्षणांमध्ये, व्यक्तिला ताप किवा कफ होत असल्याचं समोर आलं आहे. व्हायरल मेसेजमध्ये Covid Omicron XBB व्हेरियंट, सांधेदुखी, न्यूमोनिया, पाठदुखी, मानदुखी आणि डोकेदुखी ही लक्षणे आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा Covid Omicron XBB व्हेरियंट पाचपटीने धोकादायक असल्याचंही मेसेजमध्ये सांगितलं आहे.
This message is circulating in some Whatsapp groups regarding XBB variant of #COVID19.
The message is #FAKE and #MISLEADING. pic.twitter.com/LAgnaZjCCi
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) December 22, 2022
मेसेज मोठ्या प्रमाणाता व्हायरल होत असल्याने सरकारने या मेसेजची दखल घेतली. भारत सरकारने Covid Omicron XBB या व्हेरियंटबाबतची माहिती आणि लक्षणांविषयी खुलासा केला आहे. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) व्हायरल होत असलेला मेसेज खोटा असून दिशाभूल करणारा असल्याचं सांगितलं आहे.