पेंटरला पुन्हा मिळाले हात.... डॉक्टरांनी ब्रेन डेड महिलेच्या हातांच केलं प्रत्यारोपण

Success Story : डॉक्टरांनी हात नसलेल्या एका पेंटरचं यशस्वीरित्या ऑपरेशन केलं आहे. अपघातात हात गमावलेल्या पेंटरचे ऑपरेशनंतर पुन्हा जोडले देले. महत्त्वाचं म्हणजे या पेंटरला एका महिलेचे हात लावण्यात आले आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 6, 2024, 04:47 PM IST
पेंटरला पुन्हा मिळाले हात.... डॉक्टरांनी ब्रेन डेड महिलेच्या हातांच केलं प्रत्यारोपण title=

डॉक्टरांना देव मानलं जातं आणि प्रत्येकवेळी डॉक्टर ही बाबा खरी ठरवतात. हार्ट प्लांटपासून किडनी आणि लिव्हर प्लांटपर्यंत, डॉक्टरांनी केलेले हे पराक्रम काही चमत्कार नाहीत. ते लोकांना नवजीवन देतात. नुकताच डॉक्टरांच्या एका समुहाने एक नवा पराक्रम नोंदवला आहे. या डॉक्टरांनी हात नसलेल्या पेंटरवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. या ऑपरेशननंतर पेंटरवरचे दोन्ही हात परत आले आहेत. ब्रेन डेड महिलेचे अंगदान करण्यात आले.  हे ऑपरेशन करून डॉक्टरांनी एक अद्भुत नजारा दाखवला आहे. 

दिल्लीतील हे पहिले यशस्वी हात प्रत्यारोपण आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या 45 वर्षीय पेंटरला 2020 मध्ये रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमवावे लागले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे ऑपरेशन होऊ शकले नाही. मात्र एका महिलेच्या अवयवदानाने पेंटरसह अन्य तीन जणांचे आयुष्य बदलले.

अवयवदानाने 4 जणांना मदत 

मीना मेहता नावाच्या रुग्ण महिलेला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले. ही महिला दक्षिण दिल्लीतील एका नामांकित शाळेची प्रशासक होती. मीना यांनी जिवंत असतानाच मृत्यूनंतर आपले अवयव दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या किडनी, यकृत आणि कॉर्नियामुळे आणखी तीन लोकांचे आयुष्य बदलले आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे चार जणांना जीवनदान मिळाले आहे. 

12 तास ऑपरेशन

हात प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमच्या मेहनतीशिवाय हे शक्य झाले नसते. यशस्वी हात प्रत्यारोपण पूर्ण करण्यासाठी 12 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. या दरम्यान, हातांच्या धमनी, स्नायूआणि मज्जातंतू जोडल्या गेल्या. ऑपरेशन यशस्वी झाल्यावर डॉक्टरांनीही त्याच्यासोबतचे फोटो क्लिक केले आणि शेअर केले.

मीना मेहता यांच्या किडनी, यकृत आणि कॉर्नियाने आणखी तीन लोकांचे आयुष्य बदलले आहे. अपघातानंतर या व्यक्तीने ब्रश कधी हातात घेता येईल की नाही? असा विचार केला होता. पण मीना मेहता यांच्या हातामुळे ते शक्य झालं. शस्त्रक्रियेला 12 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. या दरम्यान, दात्याचे हात आणि चित्रकाराचे हात यांच्यामध्ये प्रत्येक मज्जातंतू आणि स्नायू जोडलेले होते. आता चित्रकार पुन्हा ब्रश धरण्यासाठी हताश झाला आहे.