धक्कादायक! तब्बल 4 कोटी बालकांना गोवरचा धोका; 'ही' चूक पडणार महागात!

सध्या महाराष्ट्रात देखील गोवरचं (Measles) प्रमाण वाढलं असून लहान बालकांना याचा अधिक त्रास होत असल्याचं दिसून येतंय. 

Updated: Nov 25, 2022, 04:43 PM IST
धक्कादायक! तब्बल 4 कोटी बालकांना गोवरचा धोका; 'ही' चूक पडणार महागात! title=

Measles : जग आता कुठे कोरोनाच्या (Corona) विळख्यातून मुक्त होताना दिसतंय. कोरोनाला प्रतिबंध व्हावा यासाठी कोरोनाची लस (Covid vaccine) देण्यात आली. कोरोना आणि त्याच्या लसीकरणाचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सर्वजण व्यस्त असतानाच आता गोवरच्या (Measles Outbreak) संसर्गाने डोकं वर काढलं आहे. सध्या महाराष्ट्रात देखील गोवरचं (Measles) प्रमाण वाढलं असून लहान बालकांना याचा अधिक त्रास होत असल्याचं दिसून येतंय. 

नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे, जगभरातील जवळपास 4 कोटी मुलांनी गोवरचा डोस चुकवला असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या आकडेवारीनुसार जवळपास 2.5 कोटी मुलांना गोवर लसीचा पहिला डोस अजून मिळू शकलेला नाहीये. तर दुसरीकजे 1.5 कोटी मुलांना गोवरच्या लसीचा दुसरा डोस मिळालेला नाहीये.

2021 मध्ये गोवरची जवळपास 90 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली होती. यामध्ये 1 लाख 28 हजार मृत्यूची नोंद करण्यात आली. माहितनुसार, 22 देशांमध्ये या आजाराचा प्रभाव पहायला मिळाला. कोरोनाच्या लसीकरणामुळे गोवरच्या लसीकरणावर परिणाम झाला आणि 2022 पर्यंत जगातील अनेक भागांमध्ये गोवरचा उद्रेक झाल्याचं समोर आलंय.

कोरोना सारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवण्यात 18 देशांमध्ये 6 कोटी डोस चुकले किंवा हे डोस देण्यास उशीर झाला. गोवरचा संसर्ग हा सर्वात धोकादायक व्हायरसपैकी एक मानण्यात येतो. मात्र यावर प्रभावी लस आहे त्यामुळे लसीकरणाच्या माध्यमातून हा संसर्ग टाळता येऊ शकतो.

गोवरचा संसर्ग टाळता यावा म्हणून जगातील 95% लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळणं आवश्यक मानलं जातं. मात्र प्रत्यक्षात फक्त 81% मुलांना गोवरचा पहिला डोस मिळाल्या समोर येतंय तर फक्त 71% मुलांना 2 डोस मिळालेत. 2008 नंतर पहिल्यांदाच इतक्या कमी लसीकरणाची नोंद करण्यात आलीये.

महाराष्ट्रात आणि खासकरून मुंबईमध्ये गोवराची संसर्गाची भीती मोठ्या प्रमाणात व्यक्त करण्यात येतेय. महाराष्ट्रात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गोवरच्या संसर्गाची 200 हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत. याशिवाय गोवर आणि रुबेलाचं वाढतं प्रमाण पाहता केंद्र सरकारने राज्यांना एडवायजरी जारी केलीये. 

गोवरची काय लक्षणं दिसून येतात?

  • ताप
  • खोकला
  • घसा दुखणं
  • अंग दुखणं
  • डोळ्यांची जळजळ होणं
  • डोळे लाल होणं
  • 5 ते 7 दिवसांत शरीरावर लालसर पुरळ येणं

गोवरचा संसर्ग कोणाला होऊ शकतो?

ज्या बालकांना लस देण्यात आलेली नसते अशा मुलांना गोवरचा संसर्ग होण्याचा धोका होण्याची शक्यता असते. याशिवाय गरोदर महिलांनाही गोवरची लागण होण्याची दाट शक्यता असते. तसंच लसीकरण न झालेल्या कोणत्याही व्यक्तीला गोवर होऊ शकतो.