...म्हणून वारंवार नमकीन खाण्याची सवय पडू शकते महागात!

चिप्स, फरसाण असे चटकदार पदार्थ खाल्यानंतर पुन्हा पुन्हा खावेसे वाटतात.

Updated: Jul 20, 2018, 11:57 AM IST
 ...म्हणून वारंवार नमकीन खाण्याची सवय पडू शकते महागात! title=

मुंबई : चिप्स, फरसाण असे चटकदार पदार्थ खाल्यानंतर पुन्हा पुन्हा खावेसे वाटतात. याचा अनुभव सर्वांनीच घेतला असेल. इतकंच नाही तर असे नमकीन पदार्थ खाल्यानंतर भूक लागते. यामागे नेमके काय कारण आहे. जाणून घेऊया...

सोडियमचे प्रमाण कमी होणे

अनेकदा शरीरात सोडियमचे प्रमाण कमी झाल्याने अधिक नमकीन खाण्याची इच्छा होते. खूप घाम आल्याने देखील शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होते.

मिनरल्सची कमी

चिप्स किंवा फ्रेंच फ्राईज खाल्यानंतरही भूक शांत होत नसल्यास शरीरात कॅल्शियम आणि पोटॅशियमची कमतरता आहे. यासाठी मिनरल्सची कमतरता भरून काढा. त्यामुळे नमकीन खाण्याची इच्छाही शांत होईल.

डिहायड्रेशन झाल्यावर

डिहायड्रेशन झाल्यावर शरीरातील इलेक्ट्रोलाईटचे संतुलन बिघडते. ते सुरळीत करण्यासाठी मीठ खाण्याची गरज भासते. अशावेळी इलेक्ट्रोलाईटने युक्त ड्रिंक्सचे सेवन करा.

तणाव

अधिक तणावामुळे देखील नमकीन खाण्याची इच्छा होते. कारण तणावात असताना शरीरातील सोडियम बाहेर पडते. सोडियमची निर्माण झालेली कमतरता भरून काढण्यासाठी नमकीन पदार्थ खावेसे वाटतात.

अॅड्रेनल ग्लॅंड काम नीट करत नसल्यास

अॅड्रेनल ग्लॅंड काम नीट करत नसल्यास सारखे नमकीन पदार्थ खावेसे वाटतात. अशावेळी शरीरातील एनर्जी लेव्हलही खूप कमी होते. यावर डॉक्टारांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.