close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Friendship Day 2018 : ... म्हणून साजरा केला जातो International Friendship Day

आपल्या आयुष्यात काही माणसं रक्ताच्या नात्याने बांधली जातात आणि आयुष्यभर आपली साथ देतात.

Updated: Aug 5, 2018, 09:42 AM IST
Friendship Day 2018 : ... म्हणून साजरा केला जातो International Friendship Day

मुंबई : आपल्या आयुष्यात काही माणसं रक्ताच्या नात्याने बांधली जातात आणि आयुष्यभर आपली साथ देतात. पण काही माणसं रक्ताच्या नात्यानं बांधलेली नसली तरीही प्रसंगी कुटुंबियांच्या आधी धावून येतात. अशी माणसं म्हणजे आपली मित्रमंडळी.  

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा 'वर्ल्ड फ्रेंडशिप डे' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तरूणाई मित्रमंडळींसोबत एकत्र येतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. फ्रेंडशिप बॅन्ड बांधून हे नातं एन्जॉय करतात. या दिवशी धमालमस्तीचं वातावरण असलं तरीही त्याची सुरूवात कशी झाली हे तुम्हांला ठाऊक आहे का? या '५' गोष्टींवरुन ओळखा तुमच्या मित्र-मैत्रिणीचा खरेपणा!

कशी झाली फ्रेंड्शीप डेची सुरूवात ? 

पहिल्या महायुद्धांनंतर जगभरात लोकांमध्ये काही लोकांबबात, देशांबाबत द्वेष, मत्सर, शत्रुत्व आणि असंतोषाची भावना होती. यामुळे जगभरात एक नकारात्मक भावना वाढत होती. ही नकरात्मकता कमी करण्यासाठी अमेरिकेमध्ये 1935 सालापासून सरकारने 'फ्रेंडशिप डे' साजरा करण्यास सुरूवात केली. साधारणपणे रविवारी सार्‍यांनाच सुट्टी असते. यादिवशी लोकं एकत्र जमून हा दिवस साजरा करू शकतात म्हणून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशीप डे' साजरा केला जातो. मित्र/मैत्रिणीचा बदललेला 'हा' अंदाज देतो प्रेमाचा इशारा!

फ्रेंडशीप डे मागील खास कहाणी 

1935 साली अमेरिकेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी सरकारने एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला. त्या व्यक्तीच्या मित्राने त्यांच्या मैत्रीच्या आठवणीत आत्महत्या केली. याप्रसंगानंतर हा दिवस 'इंटरनॅशनल फ्रेडशीप डे' म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकारसमोर ठेवण्यात आला. सरकारने हा प्रस्ताव तब्बल 21 वर्षांनी मह्णजे 1958 साली मंजूर केला. बेस्ट फ्रेंड आवडू लागल्यास या ३ गोष्टी करा!

जगभरात सेलिब्रेशन 

भारताप्रमाणे दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशीप डे साजरा केला जातो. ओहायोमधील ओर्बलिनमध्ये ८ एप्रिलला फ्रेंडशीप डे साजरा केला जातो. 

27 एप्रिल 2011  रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत 30 जुलैला अधिकृतपणे 'इंटरनॅशनल फ्रेन्डशिप डे' साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.