Gohyah Tea: Cholesterol वर रामबाण औषध! घरच्या घरी बनवा कारल्याचा चहा, जाणून घ्या असंख्य फायदे

Bitter Gourd Benefits for Cholesterol: कारल्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत त्यातून आपल्याला वाढत्या कोलेस्टेरॉलच्या (Cholestrol) समस्येमुळे आपल्यालाही आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या जीवनात तुम्ही कारल्याचे पदार्थ खाऊ शकतात त्यातून तुम्ही कारल्याचा चहा (Bitter Gourd Tea) तयार करू शकता. 

Updated: Feb 28, 2023, 01:29 PM IST
Gohyah Tea: Cholesterol वर रामबाण औषध! घरच्या घरी बनवा कारल्याचा चहा, जाणून घ्या असंख्य फायदे title=
Gohyah Tea these are the benefits of bitter gouard for cholestrol problem news in marathi

Bitter Gourd Benefits for Cholesterol: हल्ली आरोग्याच्या दृष्टीनं आपल्याला विशेष खबरदारी ही घ्यावी लागते त्यातून सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडेही लक्ष देणे गरजेचे असते. ऑफिसच्या कामांमुळे आपल्या खाण्यापिण्यातही अनेक बदल होताना दिसत आहेत. तरूण पिढी ही जास्त जंक फूडच्या (Junk Food side effects) आहारी जाते आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या संबंधितही अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. अशावेळी कोल्स्ट्रॉअलची समस्या (Cholestrol Problem) ही आज तरूण वयातील लोकांनाही सतावू लागली आहे. त्यामुळे हृदयरोगाच्याही (Heart) समस्या वाढताना दिसत आहेत. यातून आता पुन्हा एकदा आपल्या आहारातून कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा याकडेही आपल्याला लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तेव्हा जाणून घेऊया की तुम्ही तुमच्या हेल्थनुसार तुम्ही कोणत्या गोष्टींचा तुमंच्या आहारात समावेश करून घेऊ शकता. (Gohyah Tea these are the benefits of bitter gouard for cholestrol problem news in marathi)

कारलं आपल्यासाठी फार औषधी आहे त्यामुळे आपल्यालाही त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्ही कारल्याचा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीनं करू घेऊ शकता. कारलं हे चवीला (Bitter Gouard for Cholesterol) कडू असलं तरी आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यात विविध प्रकारचे गुणधर्म असतात जे आपल्याला अनेक आजारांपासून सुटका देतात. कारल्याचे फायदे इतके आहेत की त्यापासून आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते. कारल्यामध्ये अनेक फायबर्स असतात. त्यातून पोट साफ होण्यासही मदत होते. करल्यात असलेल्या एन्टीऑस्किडंट्समुळे (Anti - Oxidents) कर्करोगापासूनही बचाव होतो आणि मुख्य म्हणजे कारलं खाल्ल्यानं कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. 

कारल्याचा हर्बल टी तुम्ही कशारीतीनं बनवू शकता? 

कारल्याचे फायदे (Benefits of Bitter Gourd) हे अनेक आहेत त्याचबरोबर त्याचे एक नाही तर अनेक प्रकारे उपयोग करता येऊ शकतो. तुम्ही कारल्यापासून एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी ग्रीन टी (Green Tea) तयार करू शकता. यासाठी तुम्हाला कारल्याची सुकलेली सालं घ्यावी लागतील. त्यानंतर ती पाण्यात टाका आणि त्यातून तुम्ही घरगुती हर्बल टी (Home Made Herbal Tea) तयार करू शकता. गोह्या टीमधूनही तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. परंतु तुम्हाला घरच्या घरीच जर का हा चहा बनवायचा असेल तर तुमच्यासाठी हे फार मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरू शकते. अनेकदा आपल्याला ऑफिसला जाताना लिक्विड घेऊन जाणं शक्य होत नाही तेव्हा तुम्ही पावडरच्या (Tea Power) रूपानंही ही हर्बल टी घेऊन जाऊ शकता. 

कोलेस्टेरॉल असणाऱ्यांसाठी हर्बल टी कसा फायदेशीर ठरतो? 

हा हर्बल टी (Herbal Tea) तुम्ही दिवसांतून दोनवेळा पिऊ शकता. त्यातून तुमचे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होईल. त्यातून तुमचे बॅड कोलेस्टेरॉलही (Bad Cholesterol) कमी होण्यास मदत होऊ शकते.