का दिला जातो पावसाळ्यात पालेभाज्या न खाण्याचा सल्ला?

जाणून घ्या यामागची काही खास कारणं....

Updated: Jun 19, 2019, 03:34 PM IST
का दिला जातो पावसाळ्यात पालेभाज्या न खाण्याचा सल्ला?  title=

मुंबई : डॉक्टर नेहमीच पालेभाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. पण पावसाळ्यात पालेभाज्या खाणे आरोग्यास धोकादायक असते असे अनेकांचेच मत. त्यामागची कारणंही तशीच आहेत. पावसाळ्यात भाज्यांवर कीड, किटाणूंची वाढ होते. त्यामुळे अशा भाज्या खाणे आजारांना आमंत्रण देणारे ठरते. कोणतीही भाजी बाजारात येण्यापूर्वी अनेक ठिकाणांवरून वाहतूक करून आणली जाते. पावसाळ्यात वाढलेल्या घाणीमुळे भाज्या खराबही होण्याची शक्यता वाढते.

- पावसाळ्यात कोबी, फुलकोबी (फ्लॉवर) आणि पालक यांसारखे पदार्थ खाऊ नये कारण पावसाळ्यात पालेभाज्यांमध्ये अनेकदा न दिसणारे कीटक असतात. या भाज्या खाण्यामुळे पोटदुखी आणि इतर संबंधित समस्या उद्भवतात.

- मान्सूनमध्ये सुर्यप्रकाश भाज्यांपर्यंत न पोहोचल्याने किटाणूंची संख्या वाढते आणि अशा भाज्या खाल्ल्याने शरीरात संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढते.

- भाज्या हिरव्या आणि चमकदार भासविण्यासाठी रंग भरलेल्या इंजेक्शन दिले जाते. बनावट रंगाचा परीणाम शरीरावर होत असतो.

- रस्त्यावरील हिरव्या पालेभाज्यांनी बनलेले पदार्थ खाऊ नका. कारण भाज्या स्वच्छ प्रकारे धुतल्या जात नाहीत. त्यामुळे पोटात बॅक्टेरीया गेल्याने इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. ज्यामुळे अपचन, जंत, ताप यांसारखे आजार उदभवतात.