तुम्ही देखील 'या' गोष्टींच सेवन मोठ्या प्रमाणात करता का? मग सावधान! तुम्हाला देखील पडू शकतं टक्कल

जर आपला आहार आणि जीवनशैली योग्य नसेल, तर एक दिवस आपणही टक्कल पडण्याच्या समस्येला बळी ठरू शकतो.

Updated: Aug 7, 2022, 09:49 PM IST
तुम्ही देखील 'या' गोष्टींच सेवन मोठ्या प्रमाणात करता का? मग सावधान! तुम्हाला देखील पडू शकतं टक्कल title=

मुंबई : बऱ्याच लोकांना केस गळ्याची समस्या उद्भवत आहे. काही लोकांनी वयाप्रमाणे, तर काहींना गरोदरपणात तर काही लोकांना तरुण पणातच केस गळण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. लोक यावर वेगवेगळे उपाय करुन पाहातात. परंतु तरी देखील केस गळणे काही थांबत नाही. ज्यामुळे बऱ्याच लोकांना टक्कंल देखील पडतं. तसे पाहाता केस गळण्यामागे अनेक कारणं कारणीभूत आहेत, जसे की हवामान, उत्पादने, हार्मोनल्स प्रॉबलम्स इत्यादी. परंतु आणखी एक महत्त्वाचे कारणं आहे, ज्याकडे आपण इच्छा असूनही दुर्लक्ष करू शकत नाही. ते म्हणजे अन्न.

जर आपला आहार आणि जीवनशैली योग्य नसेल, तर एक दिवस आपणही टक्कल पडण्याच्या समस्येला बळी ठरतो. टक्कल पडणे उपचार करणे खूप कठीण आहे आणि ज्या लोकांना याचा त्रास होतो ते बरेचदा तणावाखाली असतात.

चुकीच्या आहारामुळे आपण टक्कल पडणेच नाही तर शरीराशी संबंधित इतर अनेक समस्यांचे रुग्ण बनू शकतो. अनेकदा लोक आपल्या आहाराकडे लक्ष देत नाहीत आणि केस गळण्या सारख्या समस्यांना बळी पडतात.

आज आम्ही तुम्हाला अशा खाद्यपदार्थ किंवा खाण्यापिण्याविषयी सांगणार आहोत, ज्याचे अतिसेवन तुम्हाला टक्कल पडण्याचा बळी ठरू शकते. त्यांच्याबद्दल जाणून घ्या…

दारू

कुणाला दारूचे व्यसन लागले, तर त्यातून सुटणे सोपे नाही. हे पोट, त्वचा आणि केसांसाठी विषासारखे काम करते. जर एखाद्याला मर्यादेपेक्षा जास्त दारू पिण्याची सवय असेल तर त्याचे केस गळायला लागतात. याची सवय झालेली व्यक्ती लवकरच टक्कल पडण्याची शिकार होते, असे संशोधनातून समोर आले आहे. परंतु याचा कोणताही पुरावा नाही, परंतु अहवालानुसार, असे होऊ शकते.

साखर

जर तुम्ही जास्त साखर खाल्ली किंवा गोड पदार्थ खाल्यामुळे तुमच्या टाळूमध्येही साखर जमा होऊ शकते. टाळूवर जमा होणारे बॅक्टेरिया केसांची मुळे कमकुवत करतात आणि केस गळणे सुरू होते. गोड खा, पण मर्यादित प्रमाणात खा. जास्त साखर खाल्ल्याने केस लवकर कमकुवत होतात आणि केस लवकर गळू लागतात.

प्रक्रिया केलेले अन्न

अशा पदार्थांमध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि कृत्रिम गोष्टी आढळतात, ज्यामुळे केस कमकुवत होऊ लागतात. त्यात मिसळलेले मीठ आणि संपृक्त चरबी असते जे आरोग्य, त्वचा आणि केसांना हानी पोहोचवते. शक्य असल्यास, अशा अन्नाकडे दुर्लक्ष करा आणि त्याऐवजी फळे आणि भाज्यांना आपल्या आहाराचा भाग बनवा. ही पद्धत तुम्हाला टक्कल पडण्यापासून वाचवेल आणि केसांना नवीन ताकद देखील देईल.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)