मुंबई : लहान मुलं असोत की, मोठी माणसे केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहेत. केसगळती रोखण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करुन पाहातात, परंतु त्याचा योग्य उपचार सर्वांनाच माहित नसतात. केसगळती रोखण्यासाठी, योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये केस केव्हा आणि कसे धुवावेत, केसांच्या काळजीसाठी योग्य हेअर प्रोडक्ट, केसांना काय लावावे आणि काय नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत.
अनेकदा लोक केस धुताना काही चुका करतात, ज्यामुळे केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. तुम्हाला देखील ही केस गळतीची समस्या असेल किंवा तुम्ही देखील या समस्येनं त्रस्त असाल, तर तुम्ही केस धुताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
काही लोक केसांना पाणी न घालता थेट शॅम्पू लावतात आणि त्याला जोमाने घासून फेस येई पर्यंत धुतात. परंतु तुम्हाला माहितीय यामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढते. केस धुण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. आता ते कसं करावं हे जाणून घ्या.
प्रथम केस ओले करा आणि पाण्याच्या मग मध्ये शॅम्पू घाला आणि त्यात थोडं पाणी घ्या.
शॅम्पू मिक्स करून केसांना लावा. याशिवाय, शाम्पू हातावर घासून त्याचा फेस बनवा आणि नंतर केसांना लावा. अगदी हलक्या हातांनी केस धुवून घ्या.
काही लोक केस धुतल्यानंतर कंडिशनर वापरतात, पण ते कसे लावायचे हे त्यांना माहिती नसते. केसांच्या मुळांना कंडिशनर कधीही लावू नये. ते फक्त केसांच्या लांबीवर वापरले पाहिजे.
काही लोक दररोज शॅम्पू करतात, परंतु असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे केमिकल रोज केसांपर्यंत पोहोचून तुमचं नुकसान होते. केस निरोगी ठेवण्यासाठी, आठवड्यातून 3 वेळापेक्षा जास्त शॅम्पू करू नका.
केसांनुसार शॅम्पू वापरा. अनेकदा लोक एकमेकांना पाहून किंवा जाहिराती पाहून शॅम्पू खरेदी करतात. यामुळे केस गळण्याची समस्या वाढते. तुमचे केस तेलकट असतील किंवा केस कोरडे असतील, तर शॅम्पू खरेदी करताना त्यामधील उपलब्ध घटकांची माहिती घ्या.
अनेकदा लोक हिवाळ्यात गरम पाण्याने केस धुतात, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. केस नेहमी सामान्य पाण्याने धुवावेत. गरम पाण्याने धुतल्याने केसांचे नुकसान होते. त्यामुळे कितीही थंडी असली तरी कडक पाण्याने केस धूवू नयेत.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)