ज्येष्ठ नागरिकांंचा विमानप्रवास सुकर करण्यासाठी खास टीप्स

नववर्षाला जोडून सुट्ट्या  आल्याने अनेकांनी हॉलिडेज प्लॅन केले असतील.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 25, 2017, 08:26 PM IST
ज्येष्ठ नागरिकांंचा विमानप्रवास सुकर करण्यासाठी खास टीप्स  title=

मुंबई : नववर्षाला जोडून सुट्ट्या  आल्याने अनेकांनी हॉलिडेज प्लॅन केले असतील.

नववर्षाचा विकेन्ड लॉग विकेंड असल्याने अनेकजण विमानाने लहानशी टूर नक्की प्लॅन करू शकतील. पण तुमच्यासोबत घरातील वयोवृद्ध व्यक्ती असतील तर विमानप्रवास करताना या काही टीप्स नक्की लक्षात ठेवा   

व्हिलचेअर  - 

विमानप्रवासाची एक मोठी डोकेदुखी असते ती म्हणजे वेळेच्या २-३ तास आधी येऊन चेकिंग आणि इतर प्रक्रिया पार पडणे. अशावेळी तुम्ही वयोवृद्ध व्यक्तींना घेऊन एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी फिरण्यासाठी व्हिलचेअरची मागणी करा.  विमानात चढ उतार करण्यासाठी व्हिलचेअर फायदेशीर ठरते. 

सिक्युरिटी चेक  

सिक्युरिटी चेकसाठी वयोवृद्धांना घेऊन तासन तास रांगेत उभे राहू नका. वृद्धांसाठी विमानतळावर विशेष सोय, खास खिडकी असते. त्याबाबत विचारणा करा.  

औषधं 

बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी, वेदनाशामक गोळ्या किंवा त्यांच्या आरोग्यानुसार लहान सहान कुरबुरींसाठी आवश्यक औषधं तुमच्या जवळ ठेवा. प्रवासापूर्वी गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  

कंम्प्रेशन सॉक्स 

विमानात फार काळ बसल्याने पायांना सूज येण्याची शक्यता असते. हा त्रास टाळण्यासाठी त्यांना कंप्रेशन सॉक्स घालून प्रवासाला घेऊन जा. कम्प्रेशन सॉक्समुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. 

ट्रॅव्हल इन्श्युरंस 

विमानप्रवासाला निघण्यापूर्वी ट्रॅव्हल इन्शुरंस नक्की काढा. सिनियर सिटीझन्ससाठी खास ट्रॅव्हल इन्शुरंसची सोय असते. त्यानुसार अनेक प्रकाराच्या सोयी दिलेल्या असतात. यामध्ये डॉक्टरांची भेट, क्रिटिकल केअर, हॉस्पिटलायझेशन यांची सोय दिली जाते.  

जेवण - 

विमान कंपन्यांनी त्यांचं जेवण कितीही चांगलं, आरोग्यदायी असल्याचा दावा केला तरीही त्यांच्यासाठी घरातून काही टिकणारे पदार्थ तुमच्यासोबत ठेवा. यामुळे ऐनवेळी पंचायत होणार नाही.