दररोज दही खाल्ल्याने होतात अनेक फायदे

दही खाणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. दह्यातील काही रासायनिक पदार्थांमुळे दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते. ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅसासारख्या समस्यांवर दही उत्तम उपाय आहे. 

Updated: Sep 24, 2017, 03:40 PM IST
दररोज दही खाल्ल्याने होतात अनेक फायदे title=

मुंबई : दही खाणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. दह्यातील काही रासायनिक पदार्थांमुळे दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते. ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅसासारख्या समस्यांवर दही उत्तम उपाय आहे. 

रात्री झोप येत नसल्यास दररोज दह्याचे सेवन करा. झोपेची समस्या हळू हळू कमी होईल.

दह्याचे नियमित सेवन शरीरासाठी अमृतासमान मानले जाते. दह्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता तसेच थकवा दूर होतो.

दह्यामुळे पचनशक्ती चांगली होते. ज्यांना भूक कमी लागते त्यांनी दह्याचे नियमित सेवन करावे. 

दह्यात कॅल्शियम असते ज्यामुळे हाडांना मजबूती मिळते. 

वजन वाढवायचे असल्यास दह्यात बदाम, बेदाणे मिसळून खाल्ल्यास फायदा होतो.

तोंड आल्यास दह्याचा वापर दिवसातून दोन ते तीन वेळा करावा.