काळ्या मीठाचे जादुई फायदे!

स्वादाबरोबरच आरोग्यदायी ठरतं काळं मीठ.

Updated: Jul 4, 2018, 08:21 AM IST
काळ्या मीठाचे जादुई फायदे! title=

मुंबई : मीठामुळे अन्नाला चव येते. अन्यथा अन्न बेचव लागेल. पण स्वादाबरोबरच आरोग्यदायी ठरतं काळं मीठ. चाट, चटणी, रायता, सलाड यावर काळं मीठ घालून खाणं फायदेशीर ठरेल. तर जाणून घेऊया काळं मीठ खाण्याचे फायदे...

# अन्न चविष्ट बनवण्याबरोबरच पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी काळं मीठ प्रामुख्याने उपयुक्त ठरतं. बद्धकोष्ठता, अपचन, गॅस, पोट फुगणे यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काळं मीठ फायदेशीर आहे. त्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक-दोन चिमटी काळं मीठ घाला आणि प्या. पोटांच्या समस्यांवर आराम मिळेल. चिमूटभर काळं मीठ आणि पाव चमचा ओवा एकत्र करुन कोमट पाण्यासोबत घेतल्यास गॅस, पोटदुखी दूर होईल.

# भूक कमी लागत असल्यास काळ्या मीठाचे सेवन करा. 

# टॉमेटोच्या रसात काळं मीठ घालून १५ मिनिटे केसांना लावून ठेवा. त्यानंतर केस स्वच्छ धुवा. त्यामुळे कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. 

# कोमट पाण्यात दोन चमचे काळं मीठ घालून घेतल्यास खोकल्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

# कोमट पाण्यात चिमूटभर हळद आणि काळं मीठ घालून दिवसातून तीन-चार वेळा घेतल्यास सर्दी-खोकल्याचा त्रास दूर होण्यास मदत होईल.

# वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेहींसाठी काळं मीठ लाभदायी ठरतं. एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर काळं मीठ आणि लिंबाचा रस घालून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास वजन कमी करण्यास मदत होईल. 

# अन्न शिजवताना काळ्या मीठाचा वापर केल्यास गॅसची समस्या दूर होण्यास मदत होईल. 

# सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी काळं मीठ उपयुक्त ठरतं. जेवल्यानंतर तासाभराने कोमट पाण्यात दोन चिमटी काळं मीठ घालून प्यायल्याने सांधेदुखीवर आराम मिळेल.