१० दिवस रोज थोडेसे जिरे खा ; मिळतील भरपूर फायदे

आपल्या देशात मसाल्याच्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे.

Updated: Apr 20, 2018, 06:13 PM IST
१० दिवस रोज थोडेसे जिरे खा ; मिळतील भरपूर फायदे title=

मुंबई : आपल्या देशात मसाल्याच्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे. मसाले फक्त स्वाद वाढवत नाहीत तर ते स्वास्थ्यपूर्ण देखील आहेत. तुम्ही जिरा राईस आवडीने खात असाल पण त्यातील जिऱ्याचे महत्त्व तुम्हाला माहित आहेत का? जिऱ्यात असलेल्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे स्वास्थ्यासंबंधिच्या अनेक समस्या दूर होतील. जिरे शरीराच्या सर्व अवयवांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज आहारात जिऱ्याचा समावेश केल्यास त्याचे अनेक लाभ मिळतील. १० दिवस रोज जिरे खाल्याने अनेक फायदे होतील. याचा परिणामही लगेचच जाणवू लागेल.

  • पचनतंत्र सुधारते. पोटांच्या समस्या दूर होतात.
  • गॅस, वात या समस्या नष्ट होतात. बद्धकोष्ठतेवर हे अत्यंत लाभदायक आहे.
  • पिंपल्स, काळे डाग यावर लाभदायी ठरते. 
  • जिऱ्यात व्हिटॉमिन ई भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य राखले जाते.
  • व्हिटॉमिन ई मुळे त्वचेवरील एजिंगचा परिणाम कमी होतो.
  • जिऱ्यात त्वचेसंबंधित आजार एग्जिमा ठीक करण्याचे गुणधर्म असतात.
  • हाताला घाम येत असल्यास जीरं पाण्यात उकळवा आणि पाणी थंड करा. तहान लागल्यावर पाणी प्यायल्याने आराम मिळेल.
  • ३ ग्रॅम जिरे आणि १५ मि. ग्रॅम फटकी फटक्यात बांधून गुलाबपाण्यात भिजत ठेवा. डोळे दुखी लागल्यास किंवा लाल झाल्यास त्यावर हे फडके ठेवा. 
  • दह्यात भाजलेल्या जिऱ्याचे चुर्ण घालून खाल्यास डायरियावर आराम मिळतो.
  • जिऱ्यात लिंबाचा रस आणि मीठ घाला. त्यामुळे उलटीसारखे वाटणे, मळमळणे यावर आराम मिळेल.
  • जिऱ्यात थोडे व्हिनेगर घालून खाल्यास उचकी बंद होते.
  • जिऱ्यात गुळ घालून त्याच्या गोळ्या बनवा. त्या मलेरियावर लाभदायी ठरतात. 
  • एक चिमुटभर कच्चे जिरे खाल्याने अॅसिडीटीपासून सुटका होते.
  • मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी एक छोटा चमचा जिरे दिवसातून दोनदा पाण्यासोबत घ्या. नक्कीच फायदा होईल.