केळीच्या पानात जेवण्याचे आरोग्यादायी फायदे

लवकरच श्रावण महिना सुरू होईल. या महिन्यात सणवारांना सुरूवात होते. घरात उदबत्ती, कापूराचा वास दरवळायला लागतो. या दिवसात उपवास आणि व्रतांनादेखील खास महत्त्व असते. उपवास अनेक लोकं देवाला नैवेद्य दाखवून केळीच्या पानामध्ये जेवतात. दाक्षिणात्य संस्कृतीमध्येही नियमित केळीच्या पानावर जेवले जाते. केवळ धार्मिक कारणांसाठी केळीच्या पानांवर जेवणाचे महत्त्व नसते तर आरोग्यासाठीदेखील केळीच्या पानांवर जेवणं फायदेशीर आहे.  

Updated: Jul 26, 2018, 01:35 PM IST
केळीच्या पानात जेवण्याचे आरोग्यादायी फायदे  title=

मुंबई : लवकरच श्रावण महिना सुरू होईल. या महिन्यात सणवारांना सुरूवात होते. घरात उदबत्ती, कापूराचा वास दरवळायला लागतो. या दिवसात उपवास आणि व्रतांनादेखील खास महत्त्व असते. उपवास अनेक लोकं देवाला नैवेद्य दाखवून केळीच्या पानामध्ये जेवतात. दाक्षिणात्य संस्कृतीमध्येही नियमित केळीच्या पानावर जेवले जाते. केवळ धार्मिक कारणांसाठी केळीच्या पानांवर जेवणाचे महत्त्व नसते तर आरोग्यासाठीदेखील केळीच्या पानांवर जेवणं फायदेशीर आहे.  

केळीच्या पानावर जेवणं का ठरते आरोग्यदायी ? 

केळीचं पान आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते स्वच्छ आणि आरोग्यसाठी फायदेशीर आहे. केळीच्या पानातील पौष्टिक घटक जेवणासोबत पोटात गेल्याने त्याचा शरीराला फायदा होतो. 
गरम जेवण केळीच्या पानावर वाढल्यानंतर त्याचा वासही जेवणात मिसळा जातो. त्यामुळे जेवताना प्रसन्न वाटते. 

जेवण सुरक्षित 

केळीच्या पानातील अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म बॅक्टेरियांचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात. लांबच्या प्रवासातही केळीच्या पानात अन्न पदार्थ गुंडाळून नेल्याने ते अधिक सुरक्षित राहतात. 

सौंदर्याला फायदेशीर 

नियमित केळीच्या पानावर खाल्ल्याने केसांचे आरोग्य सुधारायला मदत होते. ते अधिक चमकदार होतात. 

प्रदूषण वाढवत नाही 

केळीचं पान पर्यावरणाला पुरक आहे. त्यामुळे केळीच्या पानावर जेवल्याने पाण्याची बचत होते सोबतच त्याचे विघटन होणेही सोप्पे आहे.