बडिशोप खाण्याचे असेही फायदे...

बडिशोपमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. 

Updated: Sep 3, 2020, 11:19 PM IST
बडिशोप खाण्याचे असेही फायदे... title=
संग्रहित फोटो

मुंबई : बडिशोप मुखवास म्हणून जेवणानंतर खाल्ली जाते. परंतु बडिशोपचे इतरही अनेक फायदे आहेत. बडिशोपमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. बडिशोप स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करते तसंच शरीर थंड ठेवण्याचंही काम करते. बडिशोपमध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियमसारखे अनेक खनिज तत्त्व आढळतात, याचे शरीरासाठी गुणकारी फायदेही आहेत.

रक्त शुद्ध -

बडिशोप थंड असते. त्यामुळे गरमीच्या दिवसात बडिशोपच्या सेवनाने पोटाच्या समस्यांमध्ये आराम मिळू शकतो. रक्तशुद्ध होण्यासही बडिशोप फायदेशीर ठरते. 

लठ्ठपणा -

बडिशोपमध्ये फायबर असतं. त्यामुळे लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यात मदत होऊ शकते. बडिशोप शरीरावर चरबी जमू देत नसल्याने लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारशक्ती (Immunity)-

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही बडिशोप मदतशीर आहे. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशी वाढवण्याचं काम करतात. व्हिटॅमिन सी शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी अर्थात डब्ल्यूबीसीची संख्या वाढवण्यास मदत करतात.

शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा

- बदाम, बडिशोप आणि खडीसाखर यांची एकत्रित पूड करुन ती दोन वेळा घेतल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.

- बडिशोपमुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. 

- रिकाम्या पोटी बडिशोप खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते, तसंच त्वचा चमकदार होण्यासही मदत होते.

- तोंडाला दुर्गंधी येत असल्यास बडिशोप खाल्याने दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.