करटोलीचा आहारात समावेश करण्याचे अफलातून फायदे !

पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात. 

Updated: Jul 11, 2018, 06:58 PM IST
करटोलीचा आहारात समावेश करण्याचे अफलातून फायदे !  title=

मुंबई : पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात. टाकळा, करटोली,कोहळू, लोथ, अशा अनेक भाज्यांचा आजकाल आपल्या आहारातून समावेश कमी होत चालला आहे. परंतू चवीला हटके आणि आरोग्यादायी आहेत.  पावसाळ्यातील रानभाजीपैकी करटोली ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही ती तितकी कडवट नसते. त्यामुळे या भाजीचा यंदा नक्की स्वाद चाखा. 

करटोल्याच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे 

करटोला हे लहान वांग्यापेक्षा लहान आकाराचे फळ आहे. यामध्ये प्रोटीन, आयर्न घटक मुबलक असतात  तर कॅलरीज अत्यल्प असतात. 

सुमारे 100 ग्रॅम करटोल्यांमध्ये 17 कॅलरीज आढळतात. 

करटोलीमध्ये फायबर आणि अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे ही भाजी पचायला हलकी असते. 

पावसाळ्याच्या दिवसात इंफेक्शनचा धोका, बद्धकोष्ठता, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत होते. 

शरीरामधील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी करटोल्यातील phytochemicals घटक मदत करतात. सोबतच कॅन्सर, हृद्यविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते. 

मधुमेहींसाठीदेखील करटोली फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 

वातावरणात बदल झाल्याने कफ, सर्दी, खोकला, इतर अ‍ॅलर्जीचा त्रास कमी होण्यास मदत होते. 

कशी कराल करटोलीची भाजी ? 

बाजारातून ताजी हिरवीगार करटोली विकत घ्या. कारल्याप्रमाणे करटोलीदेखील चकत्यांमध्ये कापा. कांदा, टॉमेटोच्या फोडणीवर करटोली  परतून वाफवा. यामध्ये आवडीनुसार हळद, मसाला, धने-जिर्‍याची पूड, मीठ, शेंगदाण्याचा कूट मिसळून भाजी बनवा.  

करटोलीवरील आवरण काढू नका. त्यामध्ये अधिक पोषकघटक आहेत.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x