आवळा सरबत प्या, हे १० आजार टाळा

आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा उत्तम आहे.  

Updated: Aug 20, 2019, 09:23 PM IST
आवळा सरबत प्या, हे १० आजार टाळा title=

मुंबई : आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा उत्तम आहे. आवळा सरबत घेतल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. आपले आरोग्य चांगले राहते. आयुष्य वाढण्यास मदत होते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे. आवळा सरबतात मध मिसळले तर अधिक चांगले. तसेच आवळा ज्यूसमुळे महिलांची पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते.

१. आवळा ज्यूस आणि मध एकत्र करुन प्यायल्याने दम्याचा प्रभाव कमी होतो.

२. रक्त शुद्ध करण्यासाठी आवळा सरबत आणि मध खूप गुणकारी आहे.

३. आवळा सरबत नियमित घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका टळण्यास मदत होते.

४. आवळा खाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कारण मेटाबॉलिज्म व्यवस्थित होऊन वजन कमी होते.

५. आवळा हा पाचक आहे. त्यामुळे पचन व्यवस्था व्यवस्थित राहते.

६. आवळा सरबत प्यायल्याने चेहऱ्याला ग्लो येतो. तसेच त्वचा रोग दूर होण्यास मदत होते.

७. लघवीचा ज्यांना त्रास आहे. त्यांच्यासाठी आवळा सरबत चांगले.  सरबत प्यायल्याने लघवीसंबंधीचे आजार दूर होतात.

८. ज्यांना किडनी स्टोनचा आजार आहे. त्यांच्यासाठी आवळा सरबत चांगले. मुतखड्याचा आजार दूर होण्यास मदत होते.

९. आवळ्यामुळे मधुमेह (Diabetes) नियंत्रणात राहण्यास मदत होते.

१०. आवळा सरबत घेतल्याने सतत तोंड येत असेल तर ही समस्या दूर होते. तसेच डोळ्यांची शक्ती वाढण्यास मदत होते.

 

टीप : आरोग्यबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.