तुम्ही २६ वर्षांचे असाल तर १६ वर्षांचे दिसाल.. फक्त या 10 उपायांमुळे तुम्ही 10 वर्षे तरुण दिसू शकता..अगदी साधे, सोपे उपाय

एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार अशा काही गोष्टीं आहेत, ज्याच्या वापर किंवा पालन केल्याने माणूस 10 वर्षे तरुण दिसतो.

Updated: Jun 14, 2021, 03:15 PM IST
तुम्ही २६ वर्षांचे असाल तर १६ वर्षांचे दिसाल.. फक्त या 10 उपायांमुळे तुम्ही 10 वर्षे तरुण दिसू शकता..अगदी साधे, सोपे उपाय
मुंबई : तरुण आणि सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही? परंतु माणसाचे शरीर कालांतराने म्हातारे होऊ लागते. त्यामुळे जगातील प्रत्येक व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी आणि आपले वय लपवण्यासाठी काही ना काही उपाय करत असतात. तसेच शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की, नैसर्गीत रित्या तरुण दिसण्यासाठी जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्यामुळे एखाद्याचे आयुष्य केवळ वाढतच नाही, तर व्यक्ती त्याच्या वयापेक्षा आधिक तरुण दिसते. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार अशा काही गोष्टीं आहेत ज्याच्या वापर किंवा पालन केल्याने माणूस 10 वर्षे तरुण दिसतो.
 
सनस्क्रीन- मियामी बोर्डाच्या प्रमाणित त्वचारोगतज्ज्ञ अ‍ॅनी गोंजालेस म्हणतात की, सूर्यापासून अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेवर सुरकुत्या आणि डाग पडतात. त्यामुळे घरा बाहेर पडण्याआधी लोकांनी सनस्क्रीन चा वापर करावा. बरेच लोकं त्यांच्या चेहऱ्याला सनस्क्रीन लावतात. यामुळे त्यांच्या हातापेक्षा किंवा शरीराच्या कोणत्याही भागापेक्षा त्यांचा चेहरा जास्त सुंदर आणि तरुण दिसतो. परंतु चेहरा आणि हाताकडे पाहाता व्यक्तीचे वय लगेच कळते. त्यामुळे सनस्क्रीन नेहमी हातावरही वापरावी.
 
अँटी-एजिंग फूड- न्यूयॉर्कमधील सुप्रसिद्ध डर्मटालॉजिस्ट डेब्रा जॅलीमन म्हणतात की, खाण्याच्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये बरेच अँटी-एजिंग गुणधर्म आढळतात. फळांमध्ये ही अँटी-एजिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे डाळिंब, ब्लूबेरी, गोजी बेरी, ब्लॅकबेरी आणि क्रॅनबेरी यासारखे फळ खावेत. परंतु पॅकेज फूड, प्रोसेस्ड फूड आणि साखर असलेले पदार्थ टाळावेत.
 
पुरेशी झोपे- न्यूयॉर्कमधील सुप्रसिद्ध गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट निकेत सोनपाल झोपेला सर्वोत्तम अँटी-एजिंग उपचार मानतात. त्वचेवर सूर्य किरणांमुळे तणाव वाढतो, या तणावाला घालवण्यासाठी पुरेशी झोप मिळणे फार महत्वाचे आहे. कमी झोपेमुळे डार्क सर्किल,  चेहर्यावर सुरकुत्या आणि डोळे सुजणे यांसारख्या समस्या उद्धभवतात. या सगळ्या गोष्टी तुमच्या त्वचेला म्हातारी दिसण्यासाठी पुरेश्या आहेत. त्यामुळे चांगली झोप घ्या.
 
ABC फॉर्म्युला- अँटी-एजिंगची समस्या टाळण्यासाठी डर्मटालॉजिस्ट स्टेसी शिमेन्टो म्हणतात की, ABC फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा. A म्हणजे  अँटी-एजिंगची समस्या रोखण्यासाठी Antioxidants महत्वाचे आहे. B म्हणजेच सूर्यापासून निघालेल्या UVA/B पासून वाचण्यासाठी नियमितपणे सनस्क्रीनचा वापर करा. तर C म्हणजेच विटामीन Cचा वापराने डॅमेज स्किनला रिकव्हर करा.
 
हिरव्या भाज्या- डॉ. शिमेन्टो असेही म्हणतात की, चांगल्या डाएटमुळेही त्वचा निरोगी ठेवता येते. आपण आपल्या आहारात फळांसह हिरव्या भाज्यांचा समावेश करावा, कारण यामुळे फ्री रेडिकल्स, सन डॅमेज आणि इन्फ्लेमेटरी या सगळ्यापासून दूर ठेवण्याचे काम करते.
 
बॉडी पोश्चर- न्यूयॉर्कचे ऑर्थोपेडिक सर्जन ग्बोलाहम ओकुबडेजो म्हणतात की, चांगल्या आणि बरोबर बॉडी पोश्चरमुळे एखादी व्यक्ती उंच, पातळ आणि तरूण दिसते. त्यांनी सांगितले की, बहुतेक लोकं आपला वेळ खुर्ची, डेस्क, फोन किंवा स्मार्ट गॅझेटवर घालवतात आणि याचा वापर सतत केल्यामुळे शरीर वाकायला सुरवात होते. त्यामुळे तुमचे बॉडी पोश्चर नीट ठेवा.
 
हसणे - कोलंबिया विद्यापीठातील विद्याशाखा सदस्य आणि न्यूरोसायकोलॉजिस्ट सनम हाफिज म्हणतात की, माणसाचे हसू हा त्याचे वय लपवण्याचा चांगला आणि उत्तम पर्याय आहेत. त्यांनी सांगितले की, जे लोकं जास्त हसतात ते आपल्या वास्तविक वयापेक्षा खूपच लहान दिसतात. कारण हसल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर ग्लो येतो, जे तरुण असल्याचे लक्षण आहे.
 
व्यायाम- न्यूयॉर्कमधील प्रमाणित फिटनेस प्रशिक्षक जेसिका मयुको म्हणतात की, एखाद्या व्यक्तीच्या चालण्यावरुन त्याच्या वयाविषयी बरेच काही माहित होते. त्यांनी सांगितले की, नियमित व्यायाम करणार्‍यांमध्ये अँटी-एजिंगची समस्या बर्‍याच प्रमाणात नियंत्रित केली जाऊ शकते. वर्क आऊट केल्याने त्यांचे बॉडी पोश्चर सुधारते आणि लोकं तरुण दिसतात.
 
शरीराला हायड्रेटेड ठेवा - डॉ शिमेन्टो यांनी सांगितले की, एखाद्या व्यक्तीच्या चमचमत्या चेहऱ्यामागील शरीराचे हायड्रेशन लेव्हल देखील कारणीभूत आहे. आपल्या त्वचेची पीएच पातळी सांभाळणे  खूप महत्वाचे आहे. मुरुम आणि पुरळ यांसारख्या दाहक समस्या डिहायड्रेटेड त्वचेमध्ये सर्वाधिक दिसतात. यामुळे तुमच्या त्वचेला हायटड्रेट करा तिला कोरडी होऊ देऊ नका.