पारा घसरला... सावधान ! थंडीचा कडाका... हार्ट अटॅकचा धोका

हार्ट अटॅकच्या दोन घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत, थंडीत हार्ट अटॅकचा धोक वाढू शकतो असा दावा तज्ज्ञांनी केला आहे 

Updated: Jan 7, 2023, 10:12 PM IST
पारा घसरला... सावधान ! थंडीचा कडाका... हार्ट अटॅकचा धोका title=

Heart Attack in Winter : गेल्या दोन दिवसात हार्ट अटॅकच्या (Heart Attack) दोन घटनांनी सोशल मिडियावर सर्वांना हादरवून टाकलं आहे.  यातली पहिली घटना आहे फरिदाबादची (Faridabad) तर दुसरी घटना आहे इंदूरची (Indore). दोन्ही घटनांमध्ये त्या व्यक्तींचा मृत्यू झालाय.  2 दिवसांपूर्वी फरीबादमधला व्हिडीओ सोशल मीडियावर (Video Viral on Social Media) प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यात एका मेडिकल स्टोअरमध्ये औषध घ्यायला गेलेल्या एका तरुणाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत (CCTV Footage) कैद झाली. कोसळण्यापूर्वी हा तरुण बैचेन दिसतोय. अनेकवेळा आपल्या छातीवर हात ठेवून अस्वस्थ होतोय. पुढच्या काही क्षणाच हा तरुण खाली कोसळतो.

दुसरी घटना आहे इंदूरची. हा व्यक्ती जिममध्ये एंट्री करतो आणि काही क्षणात त्याचा मृत्यू होता. इंदूरच्या विजयनगरमध्ये हॉटेल व्यावसायिक प्रदीप सूर्यवंशी जिममध्ये एक्सरसाईज करत होते. साधारण पाच मिनिटं ट्रेडमिलवर व्यायाम केल्यानंतर जॅकेट काढत असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते बेशुदध होत खाली पडले. त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.. 

दोन्ही घटना नुकत्याच घडल्यात. कडाक्याच्या थंडीत हार्ट अटॅक येण्याशी संबंधित आहेत.. त्यामुळे बोचऱ्या थंडीत हार्ट अटॅकपासून कसं वाचायचं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे..

हार्ट अटॅकपासून कसं वाचाल? 

थंडित हार्ट अटॅकचा धोका?

हिवाळ्यात हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका अधिक असतो. पहाटे थंडी जास्त असल्यास रक्तवाहिन्या (Blood Vessels) आकुंचन पावतात आणि त्यामुळे अटॅक येण्याच्या प्रमाणात वाढ होते.  अति थंडीत रक्तवाहिनी बंद होऊन हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकची शक्यता होऊ शकते. तसंच हिवाळ्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात. ब्लॉक असलेल्या रुग्णांनी थंडीत काळजी घ्यायला हवी.

थंडीत काय काळजी घ्याल
थंडीच्या दिवसांत हृदयाला रक्तपुरवठा कमी होणे, रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होणे, शरीरातील अतिरिक्त चरबी, कोलेस्टेरॉलची वाढ यांच प्रमाण वाढतं. पण जीवनशैलीतील काही गोष्टींवर नियंत्रण आणल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ शकतो. यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. 

1 - अतिप्रमाणात अल्कहोल घेण्याची किंवा धूम्रपान करण्याची सवय असेल तर त्यावर नियंत्रण आणा

2 - शारीरिक आणि मानसिक ताण कमी करा, सतत ताण घेतल्याने हृदयाच्या धमन्यांना सूज येते त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात परिणामी हार्ट अटॅकची शक्यता वाढते. ताण कमी करण्यासाठी वाचन, गाणी, फिरणं अशा मन रमवा

3 -  अपुरी झोपही हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतं, त्यामुळे रात्रीच्या वेळी 7 ते 8 तासांची झोपं आवश्यक आहे. व्यवस्थित झोपेमुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

4 - रोजच्या आहारावर लक्ष देणं गरजेचं आहे. आहारात मीठ, साखर आवश्यक त्या प्रमाणातच वापरा. आहारात जास्त मीट वापरल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो, तर साखरेमुळे मधुमेहाची समस्या उद्भवू शकते. या दोन्ही गोष्टी हार्ट अटॅकला कारणीभूत ठरू शकतात.

5 -  आपल्या व्यस्त वेळापत्रकातून दररोज किमान 30 मिनटं व्यायाम करा, पण थंडीच्या दिवसात पहाटे किंवा रात्रीच्या गारठ्यात व्यायाम करणं शक्यतो टाळा