Health news: द्राक्षांचे आरोग्याला होणारे 5 फायदे

जाणून घ्या द्राक्षाचे फायदे.   

Updated: Feb 17, 2021, 02:47 PM IST
Health news: द्राक्षांचे  आरोग्याला होणारे 5 फायदे

द्राक्षामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बीसोबतच पोटॅशिअम आणि कॅल्शिअमचं प्रमाण देखील जास्त असतं. त्यामुळे द्राक्ष शरीरास अत्यंत लाभदायक असतात. याशिवाय द्राक्षांमध्ये कॅलरी, फायबर, ग्लूकोज, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व असतात. 

- द्राक्ष खाल्यामुळे रक्त दाब नियंत्रणात राहतो. ज्यांना रक्त दाबाचा त्रास आहे, त्यांनी आठवड्यातून  तीन ते चारवेळा द्राक्ष खाल्यांस त्यांना फायद्याचं ठरणार आहे. 

- शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्ष फायदेशीर ठरतात. यात भरपूर प्रमाणात आयर्न असते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास एक ग्लास द्राक्षांच्या रसात २ चमचे मध घालून प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.

- द्राक्ष खाल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते. त्याचबरोबर डाग दूर होतात. सुरकुत्यांपासून सुटका होते.

- सकाळ-संध्याकाळी द्राक्ष खाल्याने सांधेदुखीवर आराम मिळतो. भूक लागत नसल्यास आणि वजन वाढत नसल्यास द्राक्ष अवश्य खा. त्यामुळे भूक लागण्यास मदत होईल.

- द्राक्षामुळे रक्तातील नायट्रिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्याचबरोबर रक्तदाब नियंत्रित राहते.