पपई खाताय ? तुम्ही 'या' आजारांना निमंत्रण तर देत नाही ना ?

जास्त पपई खाल्ल्याने शरीराचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते

Updated: Mar 18, 2021, 01:55 PM IST
पपई खाताय ? तुम्ही 'या' आजारांना निमंत्रण तर देत नाही ना ? title=

मुंबई : पपई म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहित आहे. वजन कमी होण्यापासून त्वचेचे नुकसान रोखण्यापर्यंत आणि पचन सुधारण्यापासून ते जळजळ रोखण्यापर्यंत पपई फायदेशीर मानली जाते. पपईच्या पानांचा रस डेंग्यूशी लढण्यासही मदत करतो आणि प्लेटलेटची संख्या वाढवते. पण तुम्हाला माहिती आहे काय की जास्त पपई खाल्ल्याने शरीराचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते.तसेच असे बरेच लोक आहेत ज्यांनी तर पपई अजिबात खाऊ नये. आम्ही येथे आपल्याला अधिक पपई खाण्याच्या दुष्परिणामांबद्दल सांगत आहोत.

आरोग्य तज्ञ गर्भवती महिलांना पपई न खाण्याचा सल्ला देतात. याचे कारण असे आहे की, पपई गर्भाशयात वाढणार्‍या गर्भास हानी पोहचवते. टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार, पपईत पपाइन नावाचा घटक असतो, ज्यामुळे गर्भाशयात देखील जन्मजात दोष आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. कच्चा पपई खाल्ल्यानेही गर्भपात होण्याचा धोका असतो.

पपईमध्ये असलेले पपाइन एक प्रकारचे सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य आहे ज्यामुळे एलर्जीक प्रतिक्रिया होऊ शकते. दम्याचा रुग्ण असल्यास किंवा आपल्याला श्वासोच्छवासाचा कोणताही आजार असल्यास डॉक्टरांना न विचारता पपई खाऊ नका किंवा कमी प्रमाणात खाऊ नका. आणि कच्चा पपई तर अजिबात खाऊ नका. जास्त पपई खाल्ल्याने चिंता, श्वासोच्छवासासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

पपईत फायबरचे प्रमाण खूप जास्त असूनही बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी हा रामबाण उपाय मानला जातो. परंतु जास्त पपई खाल्ल्यास पोटात अस्वस्थता आणि अतिसार होऊ शकतो. तसेच पपईमध्येही लेटेक असते ज्यामुळे एखाद्याला पोटदुखी आणि पेटके जाणवू शकतात.

जर एखादा रुग्ण आधीच रक्तातील साखरेची औषधे घेत असेल तर त्यांनी डॉक्टरांना न विचारता पपई खाऊ नये कारण पपईमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते जे मधुमेहाच्या रुग्णांना धोकादायक ठरू शकते.

ज्या लोकांना हृदयरोग आहे त्यांनी देखील जास्त पपई खाऊ नये. जास्त पपई खाल्ल्यास हार्ट बीटचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच पपईमुळे हृदयाशी संबंधित इतरही अनेक समस्या वाढू शकतात. म्हणून, डॉक्टरांशी बोलल्यानंतर हृदयरोग्यांनी देखील पपई खावे.

(टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. २४तास.कॉम या माहितीची जबाबदारी घेत नाही.)