Health Tips: 'या' व्हिटामिन्सची कमतरता असल्यास स्किन फाटते, जाणून घ्या कारण

थंडीचा हंगाम सुरु झाला असून त्वचा कोरडी पडणं एक सामान्य बाब आहे. या काळात शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीमुळे त्वचेतील सर्वात बाहेरील पेशींचा थर मृत पावतो. त्यामुळे त्वचेला कोरडेपणा येतो. काळजी घेऊनही अनेकदा त्वचा कोरडी आणि काळी पडते.

Updated: Nov 9, 2022, 08:24 PM IST
Health Tips: 'या' व्हिटामिन्सची कमतरता असल्यास स्किन फाटते, जाणून घ्या कारण title=

Know Reason Behind Cracking Skin: थंडीचा हंगाम सुरु झाला असून त्वचा कोरडी पडणं एक सामान्य बाब आहे. या काळात शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीमुळे त्वचेतील सर्वात बाहेरील पेशींचा थर मृत पावतो. त्यामुळे त्वचेला कोरडेपणा येतो. काळजी घेऊनही अनेकदा त्वचा कोरडी आणि काळी पडते. या काळात साबण आणि पाण्याचा जास्त वापर केल्यास स्किन फाटते. पण कधी वेगळं कारण देखील असू शकते. अनेकदा शरीरात व्हिटामिनची कमतरता असल्यास स्किन फाटते. हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगनुसार व्हिटामिन ए, व्हिटामिन बी 1 (थियामिन), व्हिटामिन बी 2 (रायबोफ्लेविन) आणि व्हिटामिन बी 3 (नियासिन) च्या कमतरतेमुळे स्किन फाटते. 

व्हिटामिन ए- त्वचा फाटण्याचं कारणांमध्ये व्हिटामिन ए (Vitamin A) ची कमतरता देखील मुख्य कारण असू शकतं. यामुळे व्हिटामिनच्या कमतरतेमुळे आपली त्वचा कोरडी पडते. तसेच त्वचेला वारंवार खाजही येते. यामुळे एक्जिमा देखील होऊ शकतो. व्हिटामिन ए वाढवण्यासाठी गाजर, अंडी, गाजर, भाज्या, रताळे, पालक इत्यादींचं आहारात समावेश करावा.

व्हिटामिन सी- शरीरात सी व्हिटामिनची (Vitamin C) कमतरता असल्यास स्किन फाटते. सी व्हिटामिन आपल्या शरीरातील कोलेजेन वाढवण्यास मदत करते. जखम झाल्यानंतर हेच कोलेजन जखम भरून देखील काढते. पण शरीरात व्हिटामिन सी ची कमतरता असल्यास स्किन फाटू शकते. यासाठी आवळा, किवी, संत्र अशी आंबट फळं खाणं आवश्यक आहे. 

व्हिटामिन डी-  शरीरातील व्हिटामिन डीची (Vitamin D) कमतरता रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करते. यामुळे एक्जिमा आणि त्वचेच्या पेशींशी संबंधित आजार उद्भवू शकतो. शरीरातील व्हिटामिन डीची उणीव भरून काढण्यासाठी काही वेळ कोवळ्या उन्हात बसणं आवश्यक आहे. याशिवाय सूर्यफुलाच्या बिया, दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात वापर करा. 

थंडीत कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'हे' तेल वापरा... तातडीने करा उपाय

व्हिटामिन ई- शरीरात व्हिटामिन ईच्या (Vitamin E) कमतरतेमुळे त्वचा खूप कोरडी पडते. व्हिटामिन ई शरीरात कोलेजनच्या उत्पादनास प्रोत्साहन देते. शरीरात व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे त्वचेला भेगा पडू शकतात. शरीरातील व्हिटॅमिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी ड्रायफ्रूड्स आणि बियांचे सेवन करा.