रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखं असावे असं आपले पुर्वज का सांगायचे? जाणून घ्या डिनरची योग्य वेळ

Health Tips In Marathi: रात्रीचे जेवण हे नेहमीच कमी करावे, असं आपले पूर्वज सांगून गेले आहेत. पण शरीराला त्याचा फायदा नेमका कसा होतो. हे आज जाणून घेऊया. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 25, 2023, 05:46 PM IST
रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखं असावे असं आपले पुर्वज का सांगायचे? जाणून घ्या डिनरची योग्य वेळ title=
health tips ideal dinner time for weight loss in marathi

What In Right Time For Dinner: उत्तम आरोग्यासाठी फिटनेस असणं महत्त्वाचे आहे. यासाठी योग्य व्यायाम आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे. वेळेत जेवणे आणि झोपण्याचा सल्ला आपल्या आई-आजींकडून आपल्याला कित्येकदा मिळालेला असतो. मात्र, आपण सर्रास याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, वेळेवर न जेवल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्या उलट लवकर आहार घेतल्याने शरीराला अनेक लाभ मिळतात. 2020मध्ये प्रकाशित एका अहवालानुसार, रात्री उशीरा जेवल्याने  वजन वाढते तसंच, ब्लड शुगरचा धोकाही जाणवते. त्यामुळं रात्री सातच्या आत डिनर करणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. कसं ते जाणून घेऊया. 

रात्री सातच्या आत जेवल्यामुळं पचनाल हलके जात. तसंच, जेवणात हेवी जेवण केलं तर पचायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळं या अन्नाचं फॅट्समध्ये रुपांतर होते. त्यामुळं पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. अनेक आहारतत्ज्ञ रात्रीच्या वेळी असा हलके जेवण घेण्याचा सल्ला देतात. रात्रीच्या जेवणात डाळ भात, तांदळाची मऊ खिचडी खाल्लाने शरीराला फायदे मिळतात. 

रात्री लवकर जेवण करण्याचे फायदे

काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्रीचे जेवण लवकर केल्यामुळं वजन नियंत्रणात राहते. मात्र, फक्त वेळेत जेवण केल्याने वजन कमी होते याबाबत अद्याप काही ठोस पुरावा सापडलेला नाहीये. सातच्या आधी जेवल्याने आरोग्याला खूप फायदे मिळतात. यावर एक नजर टाकूया. 

पाचनतंत्र सुधारते. 

जेव्हा तुम्ही लवकर जेवता तेव्हा तुमचे पाचनतंत्र सुधारते. अपचन, ब्लॉटिंग सारख्या समस्या उद्भवत नाहीत. त्याचबरोबर शरीरदेखील डिटॉक्स होते. 

ब्लड शुगर नियंत्रणात राहते

रात्री लवकर जेवण केल्यास इन्सुलिनची मात्रा नियंत्रणात ठेवते. डिनर लवकर केल्यानंतर तुमच्या शरीरातील हाय ब्लड शुगरचा धोका कमी करते. तसंच, ग्लायसेमिकवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. 

पुरेशी झोप मिळते

रात्री लवकर जेवल्याने रात्री पुरेशी झोप मिळते व झोपही गाढ लागते. अधेमध्ये सतत जाग येत नाही. 

लवकर जेवण केल्याने हृदयासंबंधीत आजारही होत नाहीत. रात्री 7 पर्यंत जेवण करणाऱ्यांच्या कॅलरी उशिरा जेवण करणाऱ्यांच्या कॅलरी पेक्षा खूप कमी असतात. जेवढ्या कॅलरी कमी तेवढे वजन कमी. 

रात्री किती जेवावे?

रात्रीच्या जेवणाची वेळ ही संध्याकाळची सातची असली पाहिजे. मात्र रात्रीचे जेवण हे भरपेट न घेता अगदी हलके फुलके घ्यावे. रात्रीचे जेवण हे लवकर करावे आणि खूप कमी करावे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)