मेंदूला चालना देण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ; उतारवयातही बुद्धी राहिल तल्लख

Vitamin For Brain Health: बुद्धीला चालना मिळावी आणि मेंदू तल्लख व्हावा यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. त्याविषयी जाणून घेऊया. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 1, 2024, 06:47 PM IST
मेंदूला चालना देण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ; उतारवयातही बुद्धी राहिल तल्लख title=
health tips in marathi these best foods to Boost your Memory

Vitamin For Brain Health: म्हातारपणात स्मरणशक्ती कमजोर होत जाते, हे तर तुम्हाला माहितीच आहे. मात्र आता उतारवयात होणारी ही समस्या तरुणांनाही भासत आहे. 26-27 वर्षांच्या तरुणांनाही आजकाल छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन औषध घेतात. मात्र मेमरी पॉवर वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. यामुळं तुमची स्मरणशक्ती तल्लख होईल. (Food For Memory)

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी म्हणजेच मेंदू तल्लख होण्यासाठी काही व्यायाम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर काही पदार्थांचाही आहारात समावेश करणे गरजेचे आहे. यामुळं पोषण मिळते तसंच, बुद्धीदेखील तल्लख होते. मेंदू शार्प होतो. एका संशोधनानुसार, मेंदू तल्लख होण्यासाठी व्हिटॅमिन डी गरजेचे आहे. जर व्हिटॅमिन डी असेल तर उतारवयातही तुमची स्मरणशक्ती कायम राहते. तसंच, व्हिटॅमिन डीमुळं तुमची हाडेदेखील मजबूत राहतात.

मशरुम

संशोधनानुसार, व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी मशरुमचा आहारात समावेश करावा. व्हिटॅमिन बी 6 आणि सेलेनियमची योग्य मात्र यात असते. मशरुम ब्लड सेल्स बनवण्यास मदत करते. मेंदूला पोषण मिळते आणि कॉग्निटिव्ह फक्शन सुधारते. 

दूध

 दूध मेंदू तल्लख करतो. ते मेंदूच्या विकासासाठीदेखील खूप गरजेचे असते. त्यामुळं मुलांना दूधाचे सेवन करायला द्याच. यात हेल्दी फॅट्स असतात ते मेंदूच्या नसा मजबूत ठेवतात. 

सोया मिल्क

काही लोक गाय किंवा म्हैस यांच्या दुधाची अॅलर्जी असते. कारण यात लॅक्टोज असते जे शरीर पचवू शकत नाही. अशातच सोया मिल्कचे सेवन करावे. त्यात प्रचुर व्हिटॅमिन डी असते. जे मेमरी पॉवर आणि ब्रेनसाठी हेल्दी असते. 

फॅटी फिश

मासे खाणाऱ्या लोकांचा मेंदू हेल्दी असल्याचे मानले जाते. कारण यात नैसर्गिक पद्धतीने व्हिटॅमिन डी असते. मासांहारी लोकांना आरामात हे पोषक तत्वे मिळतात. सॅल्मन, सार्डिन, रोहू या माशांमध्ये पोषक तत्वे अधिक मिळतात. 

फोर्टिफाइड फुड

व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर फोर्टिफाइड आहार घ्या. दूध, सिरियल, ओटमील आणि संत्र्यांचा ज्यूस यात व्हिटॅमिन असते. ज्यामुळं मेमरी पॉवर वेगाने काम करते. मुलांसाठी हे ब्रेन फुड्स फायदेशीर ठरतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)