Health Tips: रिकाम्या पोटी चहा पिणं चांगलं की वाईट, जाणून घ्या!

चहा किंवा कॉफी रिकाम्या पोटी का पिऊ नका जाणून घ्या

Updated: May 8, 2022, 08:27 AM IST
Health Tips: रिकाम्या पोटी चहा पिणं चांगलं की वाईट, जाणून घ्या! title=

मुंबई : चहाची चाहत अनेकांना असते. काहींच्या दिवसाची सुरुवातच जणू चहाच्या पहिल्या घोटाने होते. कदाचित तुम्हीही असं करत असाल...मात्र तुम्हाला माहितीये का असं करणं तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. कारण रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. 

चहा किंवा कॉफी रिकाम्या पोटी का पिऊ नका जाणून घ्या

एसिडीटीचा त्रास

रिकाम्या पोटी चहाचं सेवन केल्याने अॅसिडिटीची समस्या वाढू शकते त्याचप्रमाणे पोटदुखीचा त्रासही वाढू शकतो. यासाठी कधीही सकाळी कधीही रिकाम्या पोटी चहा पिऊ नये.

पोटात जळजळ

बर्‍याचदा लोकांना पोटात जळजळ आणि पोटदुखीची समस्या असते. अशा परिस्थितीत रिकाम्या पोटी चहा पिणं हानिकारक आहे. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने मळमळ, पोटदुखी, गॅस होतो. पोटात समस्या उद्भवू शकते, म्हणून काही खाल्ल्यानंतरच सेवन करा.

झोपेची समस्या उद्भवू शकते

रिकाम्या पोटी चहाचे सेवन केल्याने इन्सोम्नियाची समस्या उद्भवू शकते. दीर्घकाळ असं केल्यास तणावाची समस्या वाढते, त्यामुळे रिकाम्या पोटी चहाचं सेवन करू नये.