Sperm Count in Men: सध्या जीवनशैली ही खूप धकाधकीची झाली आहे त्यावरून आता करिअर आणि कामावरून (Lifestyle Changes) येणारं प्रेशर यामुळे अनेकांनी आपल्या हेल्थकडेही दुर्लक्ष केलं आहे. त्यातून त्यांना आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत. याचं प्रमुख कारणं म्हणजे बदलती जीवनशैली आणि सध्या सुरू असलेलं धावपळीचं आयुष्य (Hectic Life Schedule). या सगळ्याचा परिणाम म्हणजे आरोग्याची हेळसांड. त्यातून वाईट सवयी लागल्यामुळे आता पुरूषांच्या आरोग्यातही (Men Health) फार गंभीर परिणाम होत आहेत. यंदा अशाच काही कारणांमुळे सध्या पुरूषांचेही त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आहे. त्याचसोबत त्यांच्या प्रजनन क्षमतेवरही होतो आहे. त्यामुळे या वाईट सवयी पुरूषांना वेळीच थांबवणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया की येथे नक्की कोणती काळजी पुरूषांनी घेणे गरजेचे आहे. (health tips these are the effects can reduce men sperm count avoid these bad habits)
अशाच काही वाईट सवयींमुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो आहे. यामध्ये अशी काही कारणं आहेत ज्यामुळे तुमचं स्पर्म काऊंट कमी होऊ शकतो. या सवयींमध्ये दारूचे व्यसन तसेच सिगारेटचे व्यसन असते त्यांच्यासाठी त्यांचे स्पर्म काऊंट्स कमी होण्याची शक्यता आहे. तेव्हा तुम्हाला जर दारू आणि सिगारेट (Cigarette) पिण्याची सवय असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तर त्यासाठी काहीतरी उपाय करा आणि ही सवय मोडण्याचा प्रयत्न करा तुम्हालाही त्यानं चांगला फरक जाणवेल. सध्याच्या जीवनशैलीचा विचार केला तर लोकांमध्ये सिगारेट आणि दारू पिण्याची वाईट सवय वाढू लागली आहे. तेव्हा याकडे दुर्लक्ष करू नका.
सध्या सर्वात जास्त भेडसावणारी समस्या आहे ती म्हणजे निद्रानाश (Insomenia) याची. यामुळे अनेकदा लोकांना फार गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते आहे. त्याचबरोबर यांमुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेतही फार मोठी घट होताना दिसते. खरंतर रात्री कमी झोप लागल्यानं पुरूषांच्या शरीरातील स्पर्म कांऊट (Sperm Count and Health) कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कामाच्या दगदगीमुळे रात्री वेळेत झोपणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला रात्री वेळेत झोप येणेही कठीण झाले आहे त्यातून रात्रीही मोबाईल पाहणे आणि त्या रात्रभर जागरण करणे यांमुळे पुरूषांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो आहे.
काही पुरूषांना कामाच्या दगदगीमुळे व्यायाम करणंही जमतं नाही त्यामुळे पुरूष याकडे दुर्लक्षही करतात. त्यामुळे त्यांच्या शरीरावर मोठा परिणाम होतो. व्यायामाचा फार कमी उपयोग दैनंदिन जीवनात केल्यामुळे वजन वाढू लागते आणि त्यामुळेही पुरूषांमध्ये स्पर्म काऊंट (Sperm Count) कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायामाकडे लक्ष द्या. त्यातून सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताणतणाव. ताणामुळेही पुरूषांच्या आरोग्यात बदल होतात. तेव्हा ताणताणव कमी करण्यावरही भर द्या कारण त्याचा परिणाम तुमच्या स्पर्म काऊंटवरही होऊ शकतो.