Health Tips In marathi : दिवसाची सुरुवात नाश्त्याने केल्याने दिवसभर तुम्ही उत्साही राहता सोबतच आरोग्याच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. नाश्ता हा गरजेचा आहे. परंतु धकाधकीच्या जीवनात अनेकजण घड्याळाच्या काट्यासोबत धावत असतात. वेळेअभावी अनेकजण नाश्ता टाळतात. वेळात वेळ काढून तुम्ही नाश्ता केला तरीही तो करताना चूक झाल्यास आरोग्यावर त्याचे परिणाम होतात. सकाळचा नाश्ता तुम्हाला एनर्जेटिक ठेवतो. तो टाळल्यास वजन वाढणं, हार्ट अटॅक, हृदयविकार, मधुमेह अशा एक ना अनेक समस्या वाढू शकतात. म्हणून सकाळी कसा आणि केव्हा नाश्ता करावा याबाबतचा सल्ला नक्की जाणून घ्या.
योग्य प्रमाणात नाश्ता न करणं-
नाश्ता अतिप्रमाणात किंवा अत्यल्पही करू नये. आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सामान्यपणे नाश्त्यात एक वाटी किंवा ५-८ चमचे धान्य, १०-१५ ग्राम लीन प्रोटीन आणि ग्लासभर ज्यूस असणं आवश्यक आहे.
कार्ब्स आणि प्रोटीनशिवाय नाश्ता
अनेक लोक नाश्त्यामध्ये कास आणि प्रोटीन घटकांचा समावेश करत नाहीत याचा परिणाम आरोग्यावर होतो. योग्य नाश्त्यामुळे शरीरात फॅट्स न वाढता एनर्जी म्हणजेच ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.
उशिरा नाश्ता करणं
सकाळी कधीही नाश्ता करणं आरोग्याला फायदेशीर नाही. सकाळी उठल्यानंतर तासाभरात नाश्ता करणं अपेक्षित आहे. अनेकांना सकाळी घाईत खाणं किंवा खाल्ल्यावर लगेच पडणं जमत नसल्याने उशिरा नाश्ता करण्याची सवय लागते. परिणामी आरोग्य बिघडते.
नाश्ता टाळणं
नाश्ता टाळल्यास - त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. यामुळे मेटॅबॉलिझमचं कार्य बिघडतं. सोबतच यामुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणात चढउतार होण्याची शक्यता असते. नाश्ता केल्याने तुमच्या दिवसाची सुरुवात एनर्जेटिक होते.
आणखी वाचा - नवरात्रीचा उपवास करताय? आरोग्य सांभाळायचं असेल तर 'या' पाच टिप्स करा फॉलो
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याला दुजोरा दिलेला नाही.)
|
IND
(20 ov) 253/7
|
VS |
ENG
246/7(20 ov)
|
| India beat England by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 169/8
|
VS |
NZ
173/1(12.5 ov)
|
| New Zealand beat South Africa by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.