नवरात्रीमध्ये आरोग्य जपून अशाप्रकारे करा उपवास

नवरात्रातील नवरंगांसोबत खुलणारी प्रत्येक गरबा रात्रीची मज्जा काही औरच असते.

Updated: Sep 20, 2017, 05:08 PM IST
नवरात्रीमध्ये आरोग्य जपून अशाप्रकारे करा उपवास  title=

मुंबई : नवरात्रातील नवरंगांसोबत खुलणारी प्रत्येक गरबा रात्रीची मज्जा काही औरच असते.

नवरात्रीच्या दिवसात अनेकजण नऊही दिवस उपवास करतात. अशावेळी आरोग्याची काळजी घेत या सणाचा आनंद कसा लुटावा यासाठी आहारतज्ञ नेहा चंदना यांनी सुचवलेला हा डाएट प्लान आणि खास टीप्स नक्की लक्षात ठेवा.

उपवास खरंच आरोग्यदायी असतो का ?

आरोग्याचा विचार करूनच ‘उपवास’ करण्याची संकल्पना पुढे आली. अनेक धार्मिक समारंभात त्याचे महत्त्वाचे स्थान असते. नेहा चंदनाच्या मते ‘नवरात्रीतील उपवासदेखील आरोग्यदायी आहेत. उपवासामुळे शरीर आणि मन डीटॉक्स होते. परंतू उपवास हा योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. थोडे आणि ठराविक कालांतराने खाणे आवश्यक आहे. तसेच सूर्यास्तानंतर योग्य आहार घेणे गरजेचे आहे. 

हेल्दी नवरात्री डाएट प्लॅन –

दिवसाची सुरवात ग्रीन टी व दोन खजूराने करा.
नाश्त्याच्यावेळी काही सुकामेव्याचे दाणे, किसमिस तोंडात टाका.
दुपारच्या वेळेत मिल्कशेक किंवा नारळाचे पाणी आवर्जून प्या.
सोबतीला जेवायच्या वेळेत साबूदाणा खिचडी,  राजगिर्‍याचे थालीपीठ  असे हलके पदार्थ व छास प्या.
थोड्यावेळाने भूक लागल्यास फळं खावीत.
संध्याकाळच्या वेळेत तुम्ही आलू चाट खाऊ शकता.
रात्रीच्या जेवणात व्हेजिटेबल सूप, सलाड, भोपळा घालून केलेली थालीपीठ खाऊ शकता.
रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर दूध नक्की प्या.
उपवासाच्या दिवसात फळं खाणं हा उत्तम पर्याय आहे. त्यामध्ये व्हिटामिन,मिनरल्स,फायबर्स आणि नैसर्गिक स्वरूपातील साखर असते.

चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपवासाचे दुष्परिणाम – 

दिवसभर उपवास करून अनेकजण रात्री दांडीया / गरबा  खेळायला जातात. मात्र त्यासाठी शरीरात पुरेशी उर्जा असणे आवश्यक आहे.  त्यामुळे शरीराला पुरेशी उर्जा देणारे पदार्थ दिवसभर आहारात ठेवा. अन्यथा खालील दुष्परिणाम उद्भवू शकतात.
कमजोरपणा / थकवा
रक्तातील साखर कमी झाल्यास चक्कर येणे
झोप न येणे
स्टॅमिना कमी होणे
निस्तेजपणा

उपवास करणे कोणी टाळावे ?
नेहा चंदना यांच्यामते, मधूमेही तसेच गरोदर स्त्रियांनी या काळात उपवास करणे टाळावे. उपवासामुळे रक्तातील साखरेची पातळी खालावणे हे त्रासदायक  ठरू शकते.