मुंबई : कोरोनाच्या महामारीमध्ये प्रत्येकाला इम्युनिटी या शब्दाचा अर्थ समजला आहे. मजबूत इम्युनिटीसाठी शरीराला वायरस, बॅक्टेरियल, फंगल किंवा Protozoan यांचा संसर्ग होण्यापासून संरक्षण मिळतं. इम्युनिटी पांढऱ्या रक्तपेशी, लिम्फ नोड्स आणि एंटीबॉडीज यांच्या मार्फत बनलेली असते. तर इम्युनिटी बाहेरच्या संक्रमणापासून शरीराचं बचाव करण्यास मदत करते.
ओमायक्रॉनचा प्रभाव टाळण्यासाठी, डॉक्टर नेहमी इम्युनिटी मजबूत करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, तुमची इम्युनिटी कमी असेल तर ती कशी ओळखावी?
इम्युनिटी कमी झाल्याची ही 5 लक्षणं लक्षात ठेवा
रात्री 7-8 तासांची झोप घेतल्यावर प्रत्येकाला सकाळी खूप उत्साही वाटते. परंतु ज्याची इम्युनिटी कमी आहे, त्यांना रात्री पुरेशी झोप घेऊनही दुसऱ्या दिवशी खूप सुस्ती येते. मेहनत केली नाही तरी शरीरात थकलेलं जाणवतं.
यावर एक उपाय म्हणजे व्यायाम किंवा योगासनं. या दोन्हीमुळे शरीरातील एनर्जी लेव्हल वाढते. परिणामी शरीरातील रक्ताभिसरण वाढतं थकवा दूर होऊन शरीरात ऊर्जा येते.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, प्रौढ व्यक्तींना वर्षातून 2-3 वेळा सर्दी होणं सामान्य आहे. परंतु काही लोकांमध्ये, सर्दी जास्त काळ राहते किंवा वारंवार होते. सर्दी दरम्यान इम्युनिटीला अँटीबॉडीज विकसित करण्यासाठी आणि बॅक्टेरियाशी लढण्यासाठी 3 ते 4 दिवस लागतात. परंतु जर तुम्हाला दीर्घकाळ सर्दी आणि खोकला तर हे इम्युनिटी कमकुवत असल्याचं लक्षण आहे.
इम्युनिटीचा संबंध आतड्यांशी आणि पोटाशीही असतो. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जर एखाद्याचं पोट खराब असेल तर त्याचं आरोग्य कधीही चांगले राहू शकत नाही. आपल्या शरीरातील सुमारे 70% इम्युनिटी वाढवणाऱ्या ऊती आपल्या आतड्यात असतात. जर तुम्हाला सतत अतिसार, सूज येणं, बद्धकोष्ठता या पोटाच्या समस्या होत असतील तर ते कमकुवत इम्युनिटीचं लक्षणं आहे.
कमकुवत इम्युनिटीचं पहिलं लक्षण म्हणजे जास्ताची ताणतणाव. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, तणावाचा सर्वात जास्त परिणाम इम्युनिटीवर होतो. जर एखाद्याने जास्त ताण घेतला तर त्याची इम्युनिटी कमी होते. ताण घेतल्याने पांढऱ्या रक्त पेशी आणि लिम्फोसाइट्सची संख्या कमी होते. त्यामुळे तणावापासून दूर राहणं फायदेशीर आहे.
दैनंदिन काम करताना दुखापत होणं सामान्य असतं. मात्र जर दुखापतीदरम्यान झालेली जखम बरी होण्यास जास्त वेळ लागत असेल तर ते कमकुवत इम्युनिटीचं लक्षण असू शकतं. त्याचप्रमाणे डायबेटीजमध्येही जखमा भरण्यास जास्त वेळ लागतो, त्यामुळे तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.