High Cholesterol Symptoms on Hands and Feet: अवेळी जेवण आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे ( Unhealthy Lifestyle ) सध्या बऱ्याच समस्या आजकाल मागे लागतात. चुकीचं आहार ( Unhealthy diet ) आणि बाहेरील खाण्याने शरीरात फॅट ( Body Fat ) जमा होऊ लागतं. शरीरात फॅट अधिक वाढलं की, ते तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलच्या ( Cholesterol ) रूपात जमा होण्यास सुरुवात होते. मानवी शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की हृदयाला होण्याऱ्या रक्तपुरवण्यावर परिणाम होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका ( Heart Attack ) येण्याचीही शक्यता असते.
अशा परिस्थितीत जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर ती कमी करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठीच कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या संकेतांकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की, त्याची लक्षणं हाता पायांवर दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत.
ज्यावेळी तुमच्या शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागतं, तेव्हा तुमच्या हाताच्या तसंच पायाच्या बोटांमध्ये वेदना जाणवू शकतात. यामागे एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे, हाताच्या आणि पायाच्या धमन्या या लांब असतात. या धमन्यांमध्ये ज्यावेळी कोलेस्ट्रॉल जमा होतं, त्यानंतर बोटांमध्ये वेदना जाणवू लागतात. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेदना जाणवत असतील तर वेळीच लक्ष द्यावं.
अचानक जर तुमच्या त्वचेचा रंग बदलत असेल तर ते काळजीचं कारण ठरू शकतं. कारण ज्यावेळी तुमच्या शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागतं, तेव्हा तुमच्या त्वचेचा रंग बदलू लागतो. यावेळी तुमच्या त्वचेचा रंग हलका पिवळा दिसू लागण्याची शक्यता आहे.
तुमच्या हाता पायावरील केस गळू लागलेत किंवा त्यांची वाढ अचानाक झपाट्याने होतेय का? जर ही गोष्ट तुमच्यासोबत होत असेल तर काळजी घ्या. कारण हे लक्षण तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याचं असू शकतो. यावर वेळीच लक्ष देणं फायदेशीर ठरेल.
कोलेस्ट्रॉल वाढलं की तुमच्या त्वचेच्या रंगामध्ये बदल होता. मात्र त्याचप्रमाणे तुमच्या नखांच्या रंगांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी त्वचेच्या रंगाप्रमाणे नखांचा रंगही पिवळा दिसण्याची शक्यता आहे.